निनाद संगीत विद्यालयाची गुरू पौर्णिमा संपन्न

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
 

aashaish 
 नागपूर, 
Ninad Sangeet Vidyalaya निनाद संगीत विद्यालयाचा नुकताच गुरू पौर्णिमा उत्सव संपन्न झाला, सुरवातीला सरस्वती पूजन, नंतर सर्व विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर केली ,यानंतर हेमा पंडित, हर्षदा गोडबोले यांनी सतार वर राग मारुबिहाग सुंदररित्या सादर केला, अपूर्वा नाईक हिने व्हायोलिन वर ओंकार प्रधान हा अभंग वाजवून वाहवा मिळवली, मनीषा घुषे राग हमिर, रोहिणी बापट राग मारू बिहाग, अद्द्या पांडे राग पुरिया धनश्री, श्रद्धा गिजरे राग यमन सादर केलेत, सगळ्यांची प्रस्तुती खूप चांगली होती, स्मृती मुलमुले हिने एक भक्तीगीत सादर केले, मधुलिका पारखी हिने एक गझल गाऊन सगळ्यांना खुश केले, पारुल लाभे हिने लेकीन चित्रपटातील सुनीयो जी हे गीत उत्तमरीत्या सादर केले, विद्यालयाच्या संचालिका रेखा साने यांनी भूपाली रागातील प्रसिद्ध बंदिश सहेला रे, बोल अंगाने बढत करून , बोल, ताना, यासह उत्तम रित्या सादर केली, कार्यक्रमाची सांगता सीमा दामले यांच्या बोलावा विठ्ठल या अभंग ने झाली, त्यांचे गायन अप्रतिम झाले.
सौजन्य :आशिष नाईक, संपर्क मित्र