जयताळा रोडवरील शिव मंदिरात गुरूपुजन

27 Jul 2024 12:54:05
नागपूर , 
Gurupujan जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे मागील १२ वर्षांपासून संचालित मंदिर परिसरातील प्रात:कालिन कौटुंबिक योग - प्राणायाम वर्गात गुरुपुजनाचा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष, राम खांडवे ,कार्यवाह ह.भ.प. मिलिंद वझलवार ,महिला शाखा प्रमुख व उपाध्यक्षा ,भारती कुसरे व परीक्षा प्रमुख, वसंत नानेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हिंगणा रोडवरील रेणुका मंदिर पारिवारिक योग वर्गाचे संचालकद्वय मेहूण, शुभदा अविनाश सावदेकर व आपल्या संपूर्ण योगसाधकांसह प्रामुख्याने उपस्थित होते.
 
gurupujan 
 
वर्गसंचालिका ,विजयालक्ष्मी वैष्णव यांनी  कार्यक्रमाचे संचालन  केले.  Gurupujan मंडळाचे कार्यवाह, मिलिंद वझलवार यांनी एकदिवसीय गुरूपूजन करून काहीही साध्य होणार नाही तर योग - प्राणायामास जीवनशैली म्हणून दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारण्याचे उपस्थितांना आवाहन केले. मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्रताप देशमुख यांनी मंडळातर्फे प्रकाशित योगप्रकाश मासिकातील दर महिन्याचे संपादकीय किती उत्कृष्ट असते याविषयी सांगितले.
 
आपल्या प्रमुख उदबोधनात खांडवे गुरुजींनी सांगितले की, "प्रत्येक योगसाधकाने परिसरातील प्रत्येक लेनमधील २-३ नवीन योगसाधकांसाठी विशेष अल्पकालीन शिबिर आयोजित करून नराचा नारायण व नारीचा नारायणी करण्याच्या या यज्ञ संकल्पात आपला खारीचा वाटा उचलावा."अशाप्रकारे परिसरातील जास्तीत जास्त लोकांना समाधानी,सुखी व निरोगी आयुष्य व्यतीत करण्यात सहभागी करून घ्यावे.योगसाधक, प्रमोद धनकर यांच्या सामूहिक ईश्वरप्रणीधानाने कार्यक्रमाची सुरुवात व मंडळाच्या योगगीताने सांगता झाली.आभार प्रदर्शन शोभा बावनकर यांनी केले.
 
सौजन्य: अरविंद पाठक , संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0