हिंदू मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

27 Jul 2024 14:19:33
bum 
 नागपूर,
Hindu girls' school गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदु मुलींची शाळेतील विद्यार्थिनींनी ग्रंथ दिंडी काढून गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांचे पूजन करण्यात आले.गुरुपौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.  कार्यक्रमाला  सुपरवायझर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, कार्यालय शहर नागपूर मध्य प्रमुख पाहुणे सोनाली पुराणिक  उपस्थित होते . स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  रवींद्र फडणवीसउपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका  माया बमनोटे  पर्यवेक्षक राहुल बोबडे  ,शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिंडीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रुती दाते हिने केले.
सौजन्य: माया बमनोटे,संपर्क मित्र 
 
Powered By Sangraha 9.0