उज्वल विद्यालयात हेल्मेट वितरण

27 Jul 2024 15:53:51
नागपूर,
Ujwal Vidyalaya मिरे लेआऊट कबीर नगर, येथील  उज्वल विद्यालयात  प्रभाव फाउंडेशन व आयसीआयसीआय लोम्बार्ड तर्फे मोफत हेल्मेट वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रभात फाउंडेशनचे मॅनेजर अश्विन बजाज यांनी आपल्या फाउंडेशन बद्दल उपस्थितांना माहिती दिली. हेल्मेटचे महत्व पटवून देताना बाबा नानक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सेवानिवृत्त प्राचार्या सुनीता बजाज यांनी रस्ता सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना करून दिली.
 
ujawal
 
या कार्यक्रमाला वर्ग एक ते दहावीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमात पालकांना मोठे, तर विद्यार्थ्यांना छोटे असे एकूण ३५० हेल्मेट वितरित करण्यात आले होते. Ujwal Vidyalaya मान्यवरांना शाळेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच आयसीआयसीआय लोम्बार्डचे अधिकारी  निलेश चौधरी, शाळेचे माजी मुख्याध्यापक किशोर मासुरकर,संस्थेच्या सचिव  मीना मासुरकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन शाळेचे शिक्षक प्रमोद बोढे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सहाय्यक शिक्षक  हेमंत बागडे,  सुधीर अनवाने, अविनाश गुप्ता,  वामन झाडे, अजय गोडबोले व  ताराचंद कुमेरिया या सर्वांनी मदत केली.
सौजन्य : सुधीर अनवाने, संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0