सहकारी पत संस्थेचे नवे पदाधिकारी

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
 
saunstha
 
 
नागपूर,
Cooperative Credit Society आरंभ महिला नागरी सहकारी पत संस्था (मर्या.) नागपुरच्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामधे 11 ही संचालक अविरोध निवडून आले.त्यात नीलिमा मुरमारे, नीलिमा तांदुळकर, अभिलाषा महल्ले, वैशाली भोतमांगे, मंजुषा भुरे, नलिनी महल्ले, रेखा कावरे, अश्विनी कावरे, भारती नेवले, प्रांजली मून, गायत्री खंडाते यांचा समावेश आहे. अध्यासी अधिकारी मोना मानेकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी अभिलाषा महल्ले तर उपाध्यक्ष पदी मंजुषा भुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सौजन्य : देवाशिष टोकेकर,संपर्क मित्र