अरे देवा... तलाक दिला म्हणून वडिलांनी कापला मुलीचा पाय

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
कराची,  
Pakistan talaq incident पाकिस्तानातील कराचीमध्ये एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका महिलेने लग्न मोडण्यासाठी घटस्फोटाची याचिका दाखल केली असता, तिचे वडील आणि काकांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. रागाच्या भरात वडील आणि काकांनी कुऱ्हाडीने तिचा पाय कापला. सोबिया बतूल शाह या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने तिच्या अत्याचारी पतीकडून घटस्फोट मागितल्यानंतर तिचे पाय कापण्यात आले. तिच्या पतीने कधीही कुटुंबाची जबाबदारी घेतली नाही, म्हणून तिने तलाक घेण्याचा निर्णय घेतला होता.  हेही वाचा : परदेशात शिक्षण घेणे ठरते आहे जीवघेणे...5 वर्षांत 633 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
 
Pakistan talaq incident
सोबियाचे वडील सय्यद मुस्तफा शाह आणि तिचे काका सय्यद कुर्बान शाह, एहसान शाह, शाह नवाज आणि मुश्ताक शाह यांनी सोबियाला कुऱ्हाडीने जखमी केले आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळून गेले. Pakistan talaq incident यानंतर पोलिसांनी सोबियाला नवाब शाह रुग्णालयात नेले. महिलेने पोलिसांना पुढे सांगितले की, तिचा पती सतत तिच्यावर अत्याचार करतो आणि तिला आणि तिच्या दोन मुलांना सांभाळतही नाही . सोबियाने सांगितले की, जेव्हाही ती तिच्या पतीबद्दल कुटुंबाकडे तक्रार करायची तेव्हा ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. हेही वाचा : बेंगळुरूमध्ये तरुणीची गळा चिरून हत्या, बघा हत्येचा थरारक VIDEO