श्री रुख्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपुरात संपन्न !

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
नागपूर,
Kandanyapur दरवर्षी प्रमाणे श्री रुख्मिणी मातेच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर साठी दिनांक १२ जुन रोजी प्रस्थान झाले होते. संत सद्गुरू श्री सदाराम महाराजांनी सुरू केलेल्या पालखीचे हे ४३० वे वर्ष आहे. मानाच्या पालख्यापैकी एक असलेली विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी दिनांक २१ जुलै रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथे परत आली. दरवर्षी प्रमाणे प्रतिपदेला दहीहंडी सोहळा हजारो वारकऱ्यांचे उपस्थितीत संपन्न झाला.  त्या निमित्त सकाळीं श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. पालखी परत आल्यावर पादुकांचा अभिषेक व आरती झाली. संस्थानं तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.श्री हभप पंकज महाराज महल्ले यांचे कीर्तन ,जगतगुरु राज राजेश्वर माऊली यांचे उदबोधन झाले , कार्यक्रमाला उपस्थित आमदार व माजी पालकमंत्री  यशोमती  ठाकूर यांचा संस्थानं तर्फे सचिव सदानंद साधू,उपाध्यक्ष श्री वसंत. डाहे यांनी सत्कार केला,दुपारी ४ वाजता गोपळपुरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा पार पडला सदानंद साधू सचिव तथा सोहळा प्रमुख ह्यांचे हस्ते तीर्थ उत्थापन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली,श्री क्षेत्र कौंडण्यपुर येथे भव्य दहीहंडी उत्सव संपन्न झाला.
  
dt
 अध्यक्ष नामदेव अमाळकर, उपाध्यक्षवसंत डाहे, विश्वस्त हिम्मत टाकोणे,सुरेश काका चौहान,अशोक पवार अतुल ठाकरे हभप पंकज महाराज महल्ले Kandanyapur , विणेकरी विठोबा बागडे ,श्याम श्रीराव स्वप्नील जमखुटे,सर्वांचे उपस्थितीत पार पडला ह्या सोहळ्या ला पंचक्रोशीतील हजारो वारकरी आले होते अत्यंत भक्तिमय वातावरणात व आई रुख्मिणी मातेच्या व संत सद्गुरू सदाराम महाराजांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.पंचक्रोशीतील हजारो वारकरी सहभागी झाले होते . 
सौजन्य:  सदानंद साधू, संपर्क मित्र