चोरट्याकडून दानपेटीतील रक्कम लंपास

मंदिरात चोरी

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
मालेगाव, 
शहरातीलdonation box looted रामनगर कॉलनीतील त्रिमूर्ती मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी करून दानपेटीतील रक्कम लंपास केल्याची घटना २६ जुलै च्या मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असून, चोरट्याने मंदिराच्या दाराचे कोंडे कापून चोरी केली आहे. घटनेची रीतसर फिर्याद मंदिराचे अध्यक्षा तर्फे पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
 
 

erere 
त्रिमूर्ती मंदिर donation box lootedरामनगर कॉलनी येथे २६ जुलै च्या मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या समोरील दाराचे व आतील दाराचे कडी कोंडे कटरने कापून आत प्रवेश केला तर मंदिरातील दानपेटी तोडून रोख रक्कम अंदाजे ६ ते ७ हजार रुपये लंपास केले ही घटना सकाळी मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या महिलांच्या लक्षात आली असता त्यांनी या घटनेची माहिती संस्थांनचे अध्यक्ष मिठूलाल उंटवाल व सचिव प्रभाकर टवलारकर यांना दिली. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिस स्टेशन मालेगाव येथे याबाबत कळविण्यात आले असता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली त्याचबरोबर वाशीम येथून ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. परंतु पावसामुळे श्वान पथकाला चोरट्याचा शोध घेता आला नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक रवी सैबेवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.