मरावे परी नेत्र रुपी उरावे : डॉ सुवर्णा हुबेकर

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
गोंदिया, 
‘मरावे परीeye donation कीर्ती रुपी उरावे’ या उक्ती प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हयातीतच आपल्या संमतीने नेत्रदानाचा संकल्प पत्र भरून टाकावा. कारण राज्यात लाखो अंध व्यक्ती डोळ्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या नेत्रदानामुळे गरजू जग बघू शकतो, असे प्रतिपादन जल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.

dfdf 
 
महाराष्ट्र राज्यeye donation आरोग्य प्रशासना तर्फे जागतिक अवयव दान जनजागृती सप्ताह 22 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने कलापथकाद्वारे शहरातील नेहरू चौक येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या येलम यांनी शहरातील जनतेला नेत्रदान, रक्तदानाचे महत्व सांगून ऑनलाईन अर्ज भरून सुद्धा डोनर होता येत असल्याची माहिती दिली. माजी नगरसेविका भावना कदम यांनी, अवयवदान जनजागृती सप्ताह निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करून यात लोकसहभाग वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. प्रसंगी शासकीय जीएनएम महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी परिचरिकांनी अवयवदानाबद्दल पथनाट्यद्वारे जनजागृती करून जनतेला माहिती दिली. तसेच पत्रक व पोस्टरद्वारे जनजागृती केली. कार्यक्रमात आधार महिला संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या.