अन्यायाविरोधात एकदिवसीय धरणे

    दिनांक :27-Jul-2024
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
तालुक्यातीलprotest against injustice कोरंभी व अरततोंडी येथील अतिक्रमणधारकांवर ग्रामपंचायतीच्यावतीने होणार्‍या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करुन तहसिलदारांना निवेदनातून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. कोरंभी त.सा.कं. 19 येथील गट नं. 84,75,55, 115 अतिक्रमणधारक सन 1972-73 पासून अतिक्रमण शेती करुन कुटूंबाचे पालन पोषण करीत आहेत. असे असतांना कोरंभी ग्रापंच्यावतीने सार्वजनिक ग्रापं मालकीच्या आबादी गट 84 जागेत धान पेरणी करुन नये म्हणून ग्रापं अधिनियम 1958 चे कलम 53 नुसार अतिक्रमण काढण्याची नोटीस अतिक्रमणधारक शेतकर्‍यांना दिली.
 
 

fdfdf 
अतिक्रमण protest against injusticeकाढले नाही तर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे नोटीसात म्हटले आहे. एक वर्षापासून अतिक्रमण दूर करण्याविषयी मोजक्याच लोकांना नोटीस देवून कायद्याची दमदाटी देण्यात येत आहे. मात्र सार्वजनीक जागेत गावातील अनेक श्रीमंत लोकांची अतिक्रमण काढण्याविषयी कोणत्याच प्रकारचे नोटीस त्यांना ग्रामपंचायत देत नाही. मोजक्याच लोकांना अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई पक्षपातीपणाने केली जाते आहे. त्यामुळे गट नं. 84 ही जागा निश्‍वित कुणाकडे आहे, याची मालकी अधिकार कुणाकडे हे निश्‍चित करुनच ज्या विभागाकडे आहे, त्या विभागाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. सार्वजनीक जागेत इतर लोकांनी केलेले अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत आम्हाला सुद्धा हटवण्यात येवू नये, या मागणीसाठी अतिक्रमणधारकांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव सलामे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे केले. तसेच मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले. यावेळी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी किशोर तागडे, दिनेश पंचभाई, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष सुखदेव मेश्राम, सडक अर्जुनी युवा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पुरूषोत्तम रामटेके, गुरुदेव राऊत तसेच प्रामुख्याने अतिक्रमणधारक शेतकरी उपस्थित होते.