बेंगळुरूमध्ये तरुणीची गळा चिरून हत्या, बघा हत्येचा थरारक VIDEO

27 Jul 2024 10:25:31
बेंगळुरू, 
Bengaluru murder दोन दिवसांपूर्वी कोरमंगला येथे एका 'पेइंग गेस्ट'मध्ये गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये एक पुरुष तिच्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलैच्या रात्री महिलेची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोराने खोलीत घुसून 24 वर्षीय कृती कुमारीची हत्या केली. हेही वाचा : यमुनेमध्ये अमोनियाच्या पातळीत वाढ!
 

Bengaluru murder 
 हेही वाचा : 'हा बंगालचा अपमान आहे' असे का म्हणाल्या ममता बॅनर्जी ?...का झाला त्यांचा माईक म्यूट ?
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कृती कुमारी ही बिहारची असून ती शहरातील एका खासगी कंपनीत काम करत होती. मारेकऱ्याला अद्याप अटक झालेली नाही. Bengaluru murder एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते कोरमंगला घटनेचे असल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा : अरे देवा... तलाक दिला म्हणून वडिलांनी कापला मुलीचा पाय
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती पॉलिथिन बॅग घेऊन 'पेइंग गेस्ट' रूममध्ये प्रवेश करत आहे. तो दरवाजा ठोठावतो आणि काही वेळाने त्या महिलेला ओढून बाहेर काढताना दिसतो. पीडिता हल्ल्याचा प्रतिकार करते, पण मारेकरी तिला पकडतो, तिचा गळा कापतो आणि पळून जातो. आवाज ऐकून इमारतीतील इतर महिला घटनास्थळी पोहोचल्या मात्र तिला वाचवण्यात यश आले नाही. हेही वाचा : पाच लाखांनी सजलेले कावड गंगाजल घेऊन रवाना...
Powered By Sangraha 9.0