- ट्रम्प यांचा दावा
वॉशिंग्टन,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या विरोधात डेमॉकॅटिक पार्टीने बंड केल्यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली, असा दावा रिपब्लिकन उमेदवार Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मिन्नेसोटा येथे शनिवारी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हा दावा केला. ते खरोखरच बंड होते आणि ते डेमॉकॅट्सने केले होते. 14 दशलक्ष मते मिळालेल्या माणसाच्या विरोधात हे बंड होते. त्यांना पळ काढायचा होता. पण, पक्ष त्यांना पळ काढू देत नव्हता. बायडेन यांनी अतिशय घाणेरडी वागणूक दिली. आपण कठीण मार्गावर जायचे की सोप्या मार्गावर हे ठरवा, असे बायडेन यांना सांगण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हे बंड झाले. बायडेन यांना 25 व्या घटना दुरुस्तीची धमकी देण्यात आली. आम्ही तुम्हाला 25 व्या घटना दुरुस्तीची धमकी देत आहोत. आपण संज्ञानात्मक आणि शारीरिकदृष्ट्या गोंधळलेले आहात आणि तुन्ही बाहेर पडला नाहीत, तर आम्ही तुम्हाला 25 व्या घटना दुरुस्तीने बाहेर काढू, असे त्यांना धमकावण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्षीय उत्तराधिकार निश्चित करण्यासाठी अमेरिकी संविधानात 25 वी घटनादुरुस्ती काँग्रेसने मंजूर केली. यानुसार राष्ट्राध्यक्ष शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचे समजल्यास उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ त्यांना पदावरून काढू शकतात. मी जातो, असे बायडेन यांनी सांगितले. त्यानंतर ते अतिशय शूर असल्याचे खोटे वृत्त प्रसारित करण्यात आले. ते शूर नव्हते, त्यांना बळजबरीने काढण्यात आले, असा दावा Donald Trump ट्रम्प यांनी केला.