टोकियो,
परराष्ट्र व्यवहार मंत्री Jaishankar-Blinken एस. जयशंकर यांनी रविवारी अमेरिकेतील त्यांचे समकक्ष अँटनी ब्लिंकेन यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध तसेच जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर तपशीलवार चर्चा केली. टोकियोतील परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीच्या पृष्ठभूमीवर त्यांच्यात चर्चा झाली. ब्लिंकेन यांच्यासोबत चर्चा करून आनंद झाला. आमचा द्विपक्षीय अजेंडा हळुवारपणे प्रगती करीत आहे. केवळ इतकेच नव्हे, तर प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर व्यापक चर्चा झाली.
सोमवारी परराष्ट्र मंत्र्यांच्या होणार्या क्वाड बैठकीत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे, असे Jaishankar-Blinken जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारत-प्रशांतमधील महत्त्वाच्या सागरी मार्गांना कोणत्याही प्रभावापासून मुक्त ठेवण्यासाठी नवीन धोरण विकसित करण्याच्या उद्देशाने क्वाड स्थापन करण्याचा दीर्घकाळापासून प्रलंबित प्रस्तावाला आकार दिला. प्रशांत आणि हिंद महासागराच्या मध्ये दक्षिण चीन समुद्र आहे. या समुद्रावर चीन आपला अधिकार दाखवत आहे, तर फिलिपाईन्स, व्हिएतनाम, ब‘ुनेई आणि तैवान आपला अधिकार या समुद्रावर दाखवत आहे.