पाऊस पडतोय; जलधोरण हवे

28 Jul 2024 06:00:00
- प्रा. मुकुंद गायकवाड
 
water policy is needed : गेल्या तीन वर्षांमध्ये देशात कमी पाऊस झाला. यावर्षीही अजून सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. भूगर्भातील पाणी पातळी कमालीची खालावलेली आहे. राज्यात अजूनही म्हणावा असा सर्वदूर पाऊस झालेला नाही. कोकण, मुंबई, मराठवाड्याचा काही भाग आणि सोलापूर, परभणी जिल्ह्यात जोरात पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. राज्यातील धरणांमध्ये अजूनही पाणीसाठा कमीच आहे. गोसेखुर्द, तापी वगळता राज्यातील उर्वरित नद्यांना अजूनही अपेक्षेइतके पाणी नाही. घोडनदी, गोदावरी, मुळा, प्रवरा आदी नद्यांना पहिले पाणीही गेलेले नाही. पाऊस ढगफुटीसारखा होतो. त्याचे पाणी साठवता येत नाही. काही ठिकाणी तर अजून पाऊसच झालेला नाही.
 हेही वाचा : आज क्रिकेटचा डबल डोस, भारत आणि श्रीलंका संघ दिवसातून दोनदा भिडणार
 
water-conservation
 
पाणी साठवायचे कसे, असा प्रश्न आहे. जायकवाडी, उजनी, कोयना ही मोठी धरणे अजूनही भरलेली नाहीत. भूगर्भातील पाण्याची पातळी पाहता जलशिवार योजनेकडे झालेले दुर्लक्ष किती किंमत मोजायला लावते, हे स्पष्ट दिसते. पाणलोट क्षेत्रनिहाय पडणार्‍या पावसाचा विचार न करता केलेले पीकनियोजनही भूगर्भातील पाण्याच्या मुळावर आले आहे. भूगर्भाची चाळण होऊनही सरकार त्याबाबत काहीच करत नाही. कूपनलिका आणि विंधन विहिरी खोदण्याची जणू स्पर्धा लागली आहे. पिके जगवण्यासाठीच्या स्पर्धेत भूगर्भातील पाण्याचा अनिर्बंध उपसा केला जात आहे. त्यावर ना प्रशासनाचे नियंत्रण आहे ना धोरणकर्त्यांचे. या पृष्ठभूमीवर आता पाऊस पडला तसं पाणी वाहून गेलं. भुईच्या पोटातील तृष्णा इतक्यात भागणार नाही. मधून मधून असाच पाऊस पडावा लागेल. धरणांच्या पाणलोट क्षेत्राप्रमाणेच लाभक्षेत्रातही पाऊस व्हावा लागेल. नदी, नाले, ओढे, प्रपात तुडुंब भरून वाहावे लागतील.
 हेही वाचा : दादागिरी...डीलरने मुलीला फेकले छतावरून, VIDEO
 
water policy is needed : एव्हाना काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानीच्याही बातम्या येत आहेत. पाऊस कोसळतो तशाच दरडीही कोसळतात. राज्याच्या राजधानीशी संपर्क तुटल्याचे जाहीर होते. शहरांमध्ये पाणी शिरते. लोकांना स्थलांतर करण्याचे इशारे दिले जातात. जनजीवन ठप्प होते. पर्यटनस्थळे गर्दीने फुलून जातात. धबधबे, प्रवाह उत्साही लोकांचा बळी घेतात. नेहमीच्या पावसाचे दृश्य आणि त्यासंबंधीची वृत्ते यायला लागली की जणू चैतन्याचा पाझर फुटतो. सृष्टी तर मोहरून निघाली आहे. भूगर्भाच्या वरच्या थराची तृष्णा तरी भागली आहे. तिचे सध्याचे दर्शन सर्वांना हवेहवेसे वाटण्यासारखे आहे. धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद छोटे-मोठे सर्वच घेत आहेत. धरणांना निळ्याशार जलाशयाऐवजी मातीयुक्त गंध असलेल्या पाण्याचा स्पर्श झाल्याने पाण्याचा रंग थोडासा बदलला आहे. अर्थात मोठी जलाशये त्याला अपवाद आहेत.
 हेही वाचा :महाराष्ट्र, गुजरातसह 17 राज्यांचे हवामान अपडेट जाहीर
 
पाऊस पडत असला, तरी अजूनही शेतीमालाच्या भाववाढीचा आलेख खाली आलेला नाही. राज्यातील पिकाखालचे क्षेत्र यावर्षी वाढणार असल्याने जादा उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे भावही खाली येतील; परंतु हा अंदाज थोडा लवकर मांडल्यासारखी परिस्थिती आहे. पुढचे दोन महिने वेळेवर पाऊस पडावा लागेल. त्यात अंतर पडता कामा नये तसेच अतिवृष्टीही होता कामा नये. तसे झाले तरच शेतकर्‍यांना जादा उत्पादन घेता येईल आणि ग्राहकांना रास्त भावात शेतीमाल मिळेल. अर्थात हा ‘जर-तर’चा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकारने पाऊस पडता झाल्याने सुटकेचा काहीसा नि:श्वास टाकला असला, तरी चिंता अजून दूर झालेली नाही. आशेचे ढग आणि पावसामुळे सध्या शेअर बाजारात वेगळेच चैतन्य आहे. काही दिवसांपूर्वीच भेसूर आणि चिंता वाढवणारे याबाबतचे चित्र लगेच कसे आशादायी आणि उल्हास वाढवणारे झाले आहे, हे आपण सर्व पाहतच आहोत. या चित्रामुळे एक गैरसमज मात्र होण्याची शक्यता आहे. तो वेळीच दूर न केल्यास या आनंददायी चित्रातून आपण पुन्हा दु:खदायी चित्राकडे कधी प्रवास करू हे लक्षातही येणार नाही. हेही वाचा : साप्ताहिक राशिभविष्य
 हेही वाचा :लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’
 
water policy is needed : सध्या वातावरण कितीही आल्हाददायी असले तरी भूमातेची ओंजळ रिकामी आहे. ओंजळ रिकामी असेल तर आपण ती भरून घेण्याचा प्रयत्न करतोच ना? तसे आताही करायला हवे. मध्य महाराष्ट्र, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. चिंचवड, परभणी, सोलापूरसारख्या काही भागात ढगफुटी झाली. पुण्यात काही तासात चार इंच पाऊस झाला. मुंबईत तर अवघ्या काही तासांमध्ये 12 इंचांहून अधिक पाऊस झाला. असे असले तरी पुणे, नाशिक, नगर, सातारा जिल्ह्यातील धरणे अजून भरली नसल्याने त्यांचे लाभक्षेत्र आणि या धरणांवर अवलंबून असलेली खालची धरणेही पावसाची आणि पुराची वाट पाहत आहेत. खालच्या भागातील धरणे भरली तरच वरच्या भागातील धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी सुटकेचा नि:श्वास टाकतात. त्याचे कारण खालच्या भागातील धरणे रिकामी राहिली तर 30 सप्टेंबरनंतर समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली वरच्या भागातील धरणे रिकामी केली जातात. हेही वाचा :पाऊस पडतोय; जलधोरण हवे
 
 
सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांमधील प्रपात पाहताना निसर्गाच्या चमत्काराचा प्रत्यय येतो आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक नद्यांच्या पात्रांना पाण्याचा स्पर्शही झाला नव्हता. काहींच्या पात्रांचा वापर तर फक्त जायकवाडी आणि उजनीला पाणी सोडण्यासाठीच झाला होता. नीरा, कर्‍हा, घोडनदी, सीना, मुळा, प्रवरा, गोदावरी आदी नद्या अजूनही कोरड्याच आहेत. पुण्यातून वाहणारी मुळा-मुठा, इंद्रायणी, पवना, कुकडी अशा कितीतरी नद्यांमध्ये अपेक्षित पाणी अद्याप साठायचे आहे. कोकणातील काही नद्या पूररेषेवरून वाहत आहेत. गेले वर्षभर पाणीकपातीशी झुंजणार्‍या या राज्यातील नागरिकांचा पाणीप्रश्न अजूनही कायम आहे. कोपरगाव, येवला, मनमाड आणि अशाच काही शहरांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. वर्षभर नदी प्रवाही असलेली पाहणार्‍यांना आता ती तीन महिनेही वाहत नाही, हे पाहून ‘गेले ते दिन’ असे वाटत राहते. या वर्षीचे आणखी वेगळेपण म्हणजे मराठवाडा आणि दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. मात्र तो सर्वदूर सारखा नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी चांगली दिसत असली, तरी गेल्या वर्षी दुष्काळ होता. त्यापेक्षा थोडा बरा पाऊस अद्याप झालेला नाही. कोल्हापूरच्या पंचगंगा व अन्य नद्या भरून वाहिल्या, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला होता. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडावे लागले.
हेही वाचा :पाकिस्तानचा क्रूर चेहरा विद्रूप करा  
 
water policy is needed : कोकणात महाड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात काही गावांचा संपर्क तुटला होता. दरवर्षी तिथे शहरांमध्ये, गावांमध्ये पाणी घुसते. त्यात काहीच नावीन्य नाही. त्यातही यावर्षी मुंबईपेक्षा लगतच्या ठाणे जिल्ह्यात जास्त पाऊस झाला. गेल्या तीन वर्षांमधील दुष्काळामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला होता. यावर्षीच्या पावसाने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निकाली काढला तसेच पुण्यासह अन्य काही मोठ्या शहरांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली. असे असले, तरी अजूनही संकट पूर्णत: दूर झालेले नाही. त्यामुळे उतावळेपणा करून चालणार नाही. आता पाऊस पडत असला, तरी शेतकर्‍यांना हिरवा चारा येण्यासाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पाऊस म्हणजे शेतकरी, काबाडकष्टकर्‍यांचे आनंदाश्रू. पाऊस म्हणजे भूकमारीवरचे औषध, मानवजातीचे जीवन, जीवसृष्टीचा प्राण. पावसाचे असे वर्णन केले जात असले आणि सध्या पावसाने जिवात जीव आणला असला, तरी त्यामुळे लगेच चक्र बदलत नाही. माणूस शेवटी आशेवरच जगतो.
 
water policy is needed : राज्य सरकारने चांगल्या पावसामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. जलशिवार योजनेमुळे राज्यात ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी परिस्थिती नाही. तीन वर्षांच्या कमी पावसाने भूगर्भातील पाण्याची पातळी आठ-नऊशे फूट खाली गेली आहे. आता भीज पाऊस झाला, तिथे थोडेफार जादा पाणी मुरले असेल, इतकेच. भुईच्या घशाला पडलेली कोरड आणि तिच्या पोटातील तृष्णा इतक्यात भागणार नाही. मधून मधून असाच पाऊस पडावा लागेल. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जसा चांगला पाऊस झाला, तसाच तो लाभक्षेत्रातही व्हावा लागेल. एकदाच आणि काही ठिकाणी पाऊस होऊन उपयोग नसतो; तो सर्वदूर असावा लागतो. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ परवडला; परंतु कोरडा दुष्काळ नको. चांगला पाऊस होत आहे, असं मानून जलशिवार योजना किंवा पाणी अडवण्याच्या अन्य योजनांकडे दुर्लक्ष होऊ नये, हेही नमूद करायला हवे.
Powered By Sangraha 9.0