भरकटलेल्या मान्सूनला सूर गवसेल का?

03 Jul 2024 04:47:37
वेध
 
- गिरीश शेरेकर
Monsoon-Agriculture-rain यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर तर काही ठिकाणी वेळेच्या आतच झाले. बऱ्याच वर्षांनंतर असे घडले. अंदमानवरून सुरू झालेला मान्सूनचा प्रवास पुढे केरळ, कोकण किनारपट्टीपासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत झाला. पण, हा प्रवास बिनपावसाचा होता. Monsoon-Agriculture-rain राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला आहे. मान्सून आला पण पाऊस घेऊनच आला नाही, अशी चर्चा आजही सुरूच आहे. भरकटलेल्या मान्सूनला जून महिन्यात सूर न गवसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात जवळपास ७० टक्के पेरण्या व्हायच्या आहेत. Monsoon-Agriculture-rain ज्या झाल्या आहेत, त्या देखील उलटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी ६० दिवसांचे पीक असलेल्या मूग व उडदाचा कालावधी आता संपल्यात जमा आहे. Monsoon-Agriculture-rain सोयाबीनचा कालावधी पण संपुष्टात येत आहे. येत्या आठवड्यात सोयाबीनच्या पेरण्या झाल्या नाही तर उत्पादकतेवर परिणाम होईल. जो काही पाऊस झाला तो विस्कटलेला होता. Monsoon-Agriculture-rain जेथे पडला तेथे भरभर आला, उर्वरित ठिकाणी ठणठणाट, असा यंदाच्या पावसाचा आतापर्यंतचा स्वभाव राहिला आहे.
 
 
Monsoon-Agriculture-rain
 
पुढे या स्वभावात बदल होईल, असे अंदाज वर्तविले जात आहेत. अंदाज म्हणजे, लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय काही खरे नाही, असा भाव प्रत्येकाच्याच मनात आहे. शेतमालाचे उत्पादन व उलाढाल भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि शेतकऱ्यांचा महत्त्वाचा कणा आहे. मान्सूनच्या लहरीपणाने तो डगमगत असल्याने सर्वच हैराण आहेत.Monsoon-Agriculture-rain यंदा केरळात २९ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्याची गती पाहून जून महिन्यात चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा असताना सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पावसाची ही तूट ११ टक्के आहे. साधारणपणे जूनमध्ये १६५.३ मिलिमीटर पाऊस पडत असतो. मात्र, यावेळी १४७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २००१ पासून आतापर्यंत कमी पावसाची ही जून महिन्यातली सातवी नोंद आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या काळात जी पावसाची एकूण नोंद होत असते, त्यात जूनमधील १५ टक्के पाऊस ग्राह्य धरला जातो. ११ ते २७ जून या काळातील १६ दिवस अतिशय कमी पावसाची नोंद झाली आहे. Monsoon-Agriculture-rain ईशान्य भारतात पावसाची ३३ टक्के तूट नोंदविण्यात आली. मध्य भारतात १४ टक्के आणि पूर्व तसेच वायव्य भारतात १३ टक्के पाऊस कमी पडला आहे.
 
 
फक्त दक्षिण भारतातच १४ टक्के जास्त पाऊस पडला आहे. मागील १२३ वर्षांच्या इतिहासात यावेळी प्रथमच जून महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. यापूर्वी १९०१ मध्ये जून महिन्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी जूनमध्ये सरासरी तापमान ३८.०२ अंश इतके नोंदविण्यात आले, जे सामान्य तापमानापेक्षा १.९६ अंशांनी जास्त होते. Monsoon-Agriculture-rain असे असले तरी मागील २० वर्षांमध्ये जेव्हा जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी (९२ टक्के) पाऊस झाला आहे, तेव्हा त्याची तूट जुलैमधील पावसाने भरून काढली आहे. या काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. तिथेच, १७ वर्षांचा इतिहास असाही आहे की, ज्यावेळी जूनमध्ये कमी पाऊस झाला, त्या काळात चार महिन्यांतील पावसाने सरासरी ओलांडली असल्याचे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी कालच सांगितले. जूनची तूट जुलैमध्ये भरून निघण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.
 
 
Monsoon-Agriculture-rain पण, एकदम आलेला पाऊसही पिकांसाठी अडचणीचा ठरतो. पेरणी व त्यानंतर निघणाऱ्या अंकुरांना बाळसे धरण्याची सवड जर पावसाने दिली नाही तर पावसाचा शेतीला काही उपयोग नाही. खूप आक्रमकपणे आलेला पाऊस जमीन खरडून काढतो आणि जास्तीचे नुकसान करतो. पाऊस हा शेतीला पूरक ठरेल असाच आला की, उत्पादनही चांगले होते. बाजारपेठेत पैसा खेळतो. आर्थिक चैतन्य असते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये मान्सूनच्या पावसाचे तंत्र बिघडले आहे. अवकाळीचे प्रमाण वाढले आहे. हवामान बदलाचा तो परिणाम आहे, असे जाणकार सांगतात. Monsoon-Agriculture-rain हे तंत्र जागेवर येईल की, भविष्यात त्यात आणखी बिघाड होईल, हे अद्याप कोणाला सांगता आलेले नाही. तीनही ऋतूने आपले वेळापत्रक पाळावे, यावर बऱ्याच उपाययोजना जागतिक पातळीवर होत असल्या, तरी हातात फारसे काही लागलेले नाही. यंदाच्या जूनपर्यंत झाले ते गंगेला मिळाले. पुढचा पाऊस सुख व समृद्धीचा राहील, इतकीच वरुणराजाकडून अपेक्षा आहे.
 
 
९४२०७२१२२५
Powered By Sangraha 9.0