सिवान जिल्ह्यात आणखी एक पूल कोसळला

    दिनांक :03-Jul-2024
Total Views |
- 15 दिवसांत सातवी घटना
 
सिवान (बिहार), 
Siwan - Bridge collapsed : मागील काही दिवसांपासून बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या घटना वाढल्या असून, त्याच मालिकेत सिवान जिल्ह्यातील गंडकी नदीवरील पुलाचा एक भाग बुधवारी सकाळी कोसळला. गेल्या 15 दिवसांत राज्यातील अशा प्रकारची सातवी घटना आहे. जिल्ह्यातील देवरिया भागात असलेला हा छोटा पूल अनेक गावांना महाराजगंजशी जोडतो. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सिवानमध्ये गेल्या 11 दिवसांत पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.
 
 
Siwan - Bridge collapsed
 
Siwan - Bridge collapsed : उपविकास आयुक्त मुकेश कुमार म्हणाले की, वरिष्ठ अधिकारी आधीच घटनास्थळी पोहोचले आहेत आणि पूल कोसळण्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. ही घटना पहाटे 5 च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, हा पूल 1982-83 मध्ये बांधण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते, असे कुमार यांनी सांगितले. मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गंडकी नदीच्या प्रवाहामुळे पूल कमकुवत झाला असावा, असे गावकर्‍यांनी सांगितले.