चेंगराचेंगरी टाळण्यासाठी...

04 Jul 2024 05:02:05
अग्रलेख
Hathras-Stampede 2024 कुठलेही आयोजन करायचे तर त्यासंदर्भात योजना आखून पूर्ण नियोजन करण्याची गरज असते. ते जर नसेल तर योजना फसते, वेळेचा अपव्यय होतो, श्रम वाया जातात, पैशांची नासाडी होते, उद्दिष्ट अपूर्ण राहते आणि त्याचे दूरगामी परिणाम निरपराधांना भोगावे लागतात. Hathras-Stampede 2024 उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान असेच झाले. योग्य नियोजनाअभावी दुर्घटना घडली आणि या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. Hathras-Stampede 2024 अनेक जण यात जखमी झाले असून त्यांच्यावर जवळपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिला आणि छोट्या मुलांचा भरणा आहे. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगादरम्यान ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर ते फरार झाले आहेत. Hathras-Stampede 2024 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पोलिसांची अत्यल्प तैनाती, आयोजकांचे गैरव्यवस्थापन आणि अपुया उपाययोजनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रम, मेळावे, सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन लोक मृत्युमुखी पडण्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत.Hathras-Stampede 2024
 हाथरस अपघातातील आरोपी बाबावर लैंगिक छळाचे 5 गुन्हे
 

Hathras-Stampede 2024 
 
 
हाथरस दुर्घटना...बाबांच्या खोलीत फक्त मुलींनाच एंट्री!  
हाथरसमधील दुर्घटना का घडली, याची कारणे जाणून घेतली जात आहेत. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री, मंत्री, डीजीपी आदी सर्वांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. या सत्संगाची पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेण्यात आली होती. त्यासाठी हजारो जणांची गर्दी घटनास्थळी जमणार होती. परंतु परिसरात केवळ ४० पोलिसांचा बंदोबस्त होता, असा दावा केला जात आहे. इतके लोक जमणार तेव्हा त्यासाठी रुग्णवाहिका, आरोग्य सेवक किंवा डॉक्टरांची नियुक्ती, सेवाधाऱ्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. फुलराई मैदानात उघड्यावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. Hathras-Stampede 2024 उत्तरप्रदेश, हरयाणा आणि राजस्थानमधील ५० हजारांहून अधिक बाबांचे अनुयायी यात सहभागी झाले होते. सत्संगानंतर भाविक बाबांजवळ जमा झाले. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागले. त्यांच्या चरणांची धूळ घेऊ लागले. त्या ठिकाणी एक खड्डा होता. सुरुवातीला धक्का लागल्यावर काही जण पडले. त्यानंतर धावपळ सुरू झाली. जे पडले ते परत उठू शकले नाही. गर्दी त्यांच्या अंगावरून चालत होती. पाहता पाहता मोठी दुर्घटना घडली आणि अनेकांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
 हेही वाचा : एनईईटी पेपर लीक प्रकरणात आणखी एक अटक!
 
 हाथरस दुर्घटना : प्रेतांचा खच बघून पोलिसाला ‘हार्ट अटॅक'
Hathras-Stampede 2024 हाथरस दुर्घटनेच्या पृष्ठभूमीवर पुन्हा एकदा चेंगराचेंगरी का होते, त्याची कारणे काय; हे जाणून घेण्याची गरज आहे. चेंगराचेंगरीला फक्त जमावाची मानसिकताच कारणीभूत नसते. ज्या ठिकाणी सत्संग, सामूहिक मेळावे, जाहीर बैठका अथवा सभा होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जागेची योग्य रचना केल्यास बèयाच दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात. पुरेसा प्रकाश नसणे, गर्दीचा प्रवाह वेगवेगळ्या दिशांना विभागला न जाणे, विशेषतः ज्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होत आहे, अशा ठिकाणी बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसणे वा पुरेसे दरवाजे नसणे, कठडे आणि इमारतींचे कोसळणे, बाहेर पडण्याचे मार्ग बंद असणे वा किचकट, अरुंद असणे, आगीचा धोका असणे या कारणांमुळे मोठमोठ्या जाहीर कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना घडतात, असे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होते, त्या ठिकाणी किती लोक बसू शकतात किंवा उभे राहू शकतात, याचे नियोजन होणे ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. Hathras-Stampede 2024 मोठ्या प्रमाणात जमा झालेली गर्दी एकाचवेळी बाहेर पडणार असल्याने त्यांना त्यासाठी किती वेळ लागू शकतो, याचे गणित आयोजकांना पक्के माहीत असणे गरजेचे असते. हेही वाचा : पावसाचा रेड अलर्ट...सात जिल्ह्यांमध्ये सर्व शाळा बंद!
 
 
 
प्रत्येक वेळी उपरोल्लिखित कारणांमुळेच चेंगराचेंगरीच्या घटना घडतात असे नव्हे, तर कुठलीशी अफवासुद्धा यासाठी कारणीभूत ठरते. गर्दीत साप शिरला, पोलिसांचा लाठीमार सुरू झालाय्, पुढे आग लागली आहे अशा अफवांमुळेही दुर्घटना झाल्याच्या नोंदी आहेत.२००५ मध्ये सातारा जिल्ह्यातील वाईमधील मांढरदेवीच्या यात्रेत झालेली दुर्घटना विसरणे आजही शक्य नाही. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३४० लोकांनी आपले प्राण गमावले होते. एका आकडेवारीनुसार, १९५४ ते २०२१ या काळात भारतात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांमधील ७९ टक्के घटना या धार्मिक कार्यक्रमांमध्येच घडल्या आहेत. Hathras-Stampede 2024 अशा दुर्घटना केवळ भारतातच होतात असे नव्हे, विदेशातही चेंगराचेंगरीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. १८९६ मध्ये रशियन झार निकोलस द्वितीयच्या राज्याभिषेक समारंभाच्या पूर्वसंध्येला मॉस्कोत चेंगराचेंगरी झाली होती; त्यामध्ये एक हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. १९५४ मध्ये अलाहाबादच्या कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पेरूमधील लिमा येथे १९६३ साली पेरू आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यामध्ये रेफ्रीने दिलेल्या निर्णयानंतर चाहते संतप्त झाले आणि ते मैदानात घुसले होते. हेही वाचा : लाहोरमध्ये होणार भारत-पाक सामन्याची तारीख!
 
 
 
Hathras-Stampede 2024 त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मग जमलेल्या गर्दीची पांगापांग होताना बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ झालेल्या गर्दीत जवळपास ३२६ जणांचा मृत्यू झाला होता. मक्केतील हज यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. २०२५ साली झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७६९ जणांचा मृत्यू झाला होता. नुकतीच काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली असून त्यामध्ये १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. राजस्थानमधील चामुंडा देवीच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत २५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी हिमाचल प्रदेशातही नैना देवी मंदिरात अशाच दुर्घटनेत १६२ लोकांचा मृत्यू झाला होता. २००३ साली इंदूर शहरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान एका प्राचीन विहिरीवर लावण्यात आलेले दगडी स्लॅब तुटले. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ३६ लोकांचा मृत्यू झाला. Hathras-Stampede 2024 १ जानेवारी २०२२ रोजी जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ लोकांचा मृत्यू झाला. जखमींचा आकडा यापेक्षाही अधिक होता. १४ जुलै २०१५ रोजी आंध्रप्रदेशमधील राजमुंदरीमध्ये ‘पुष्करम' उत्सवादरम्यान गोदावरी नदीवर हजारो लोक पोहोचले होते. हेही वाचा : माझी लाडकी बहीण...
  
 
 
मात्र, घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत २७ लोकांचा मृत्यू झाला आणि २० लोक जखमी झाले. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पाटण्यातील गांधी मैदानामध्ये दसरा उत्सव साजरा केला जात होता. या ठिकाणी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि ३२ लोकांचा मृत्यू झाला. १३ ऑक्टोबर २०१३ रोजी मध्यप्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील रत्नागिरी मंदिरात नवरात्राचा उत्सव सुरू होता. त्याचवेळी तिथे जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. गोंधळामध्ये अनेक जण जमिनीवर कोसळले आणि ११५ जणांचा चिरडून मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. Hathras-Stampede 2024 रस्त्यातला एक पूल कोसळला अशी अफवा भाविकांमध्ये पसरली आणि घाबरलेले लोक इकडेतिकडे धावायला लागले होते. योग्य काळजी घेतली नाही तर दुर्घटना आणि विशेषतः चेंगराचेंगरी होते, असा अनुभव आहे. मग अशा दुर्घटनांमध्ये जमावाची मानसिकता काम करते आणि अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जायला हव्यात, याचीही चर्चा होणे महत्त्वाचे आहे. सामूहिक मेळावे, जमाव अथवा गर्दीच्या ठिकाणीच चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. हाथरसच्या घटनेतील जमाव हा पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये जमलेला होता.
 
 
 
मात्र, चेंगराचेंगरी होणाऱ्या ठिकाणची गर्दी नेहमी ठरवूनच जमलेली असेल असे नाही. अनेकदा आगंतुक लोक अशा कार्यक्रमांमध्ये प्रवेश करून गोंधळ घालतात. यातील कोणाचा हेतू काय, हे शोधून काढणे असंभव ठरते. Hathras-Stampede 2024 त्यामुळे बहुतांशी चेंगराचेंगरीमागे कुणी घातपात केला, हे शोधून काढणे अवघड ठरते. हाथरसच्या घटनेमागेही कुणाचा घातपाताचा संशय आहे का, हे शोधून काढायला हवे. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी, उत्स्फूर्तपणे जमलेल्या गर्दीतही चेंगराचेंगरी होऊ शकते. जमलेल्या गर्दीमध्ये घबराट अथवा भीती पसरल्यामुळे चेंगराचेंगरी होते. अशा वेळी सहकार्याची भावना अपेक्षित असते; पण तसे होताना दिसत नाही. भीती वरचढ ठरते तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट होते. आयोजकांनी कार्यक्रमांमध्ये पुरेशा लोकांनाच प्रवेश दिला तर अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात. प्रत्येक वेळी दुर्घटनेनंतर त्यांचा आढावा घेण्याऐवजी पुरेशा उपाययोजना केल्यास दुर्घटना टाळता येऊ शकतात.
Powered By Sangraha 9.0