वि. सा. संघ येथील अमेय दालनाची दुर्दशा !

    दिनांक :04-Jul-2024
Total Views |
नागपूर,  
Amey Hall वि. सा. संघ सांस्कृतिक संकुलाच्या चौथ्या मजल्यावरील लिफ्ट मधून बाहेर पडल्याबरोबर इमारतीची दुर्दशा बघायला मिळते.समोर सगळ्या ठिकाणी साचलेलं पाणी ,विविध ठिकाणी तुटलेले कॉलम (एखादा कॉलम केव्हाही तुटून, कोणाचाही जीविताला धोका होऊ शकतो ) आणि बाजूला शेवाळ.अमेय दालनाकडे जातांना डाव्या बाजूला एक टेबल आणि त्या टेबलवर  फाटकी  गादी ,दालनाच्या समोरील हे दृश्य. महाराष्ट्रातील प्राचीन शिलालेखांचे रहस्य उलगडणारा"प्रस्तर पालवी "या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला.त्यावेळी हे दिसलं, पाहतांना वाईट वाटत होते.
 
nb
 
दालनामध्ये प्रवेश केल्यावर ताकत लावून ढकलावं लागणार दार, बाहेर उष्णतेने आणि गर्मीने जीव जात असताना, दालतील बंद ए.सी. दोन्ही बाजूला हवा न देणारे (श्रोत्यांसाठी )प्रत्येकी दोन उभे पंखे (Pedestal Fan ) वक्त्याला पंख्याची हवाच लागू नयेअशी सोय. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला साचलेलं पाण्याचे डबकं इतर ठिकाणी पसरलेली घाण.Amey Hall मराठी भाषा , साहित्य आणि संस्कृतीचा सर्वांगीण विकास करणाऱ्या एका नामांकित संस्थेची अशी दुर्दशा पाहून मन हेलावलं. संकुल व्यवस्थापनाने या बाबींकडे कृपया लक्ष द्यावे ही विनंती.
सौजन्य: उमाकांत  रानडे,संपर्क मित्र