ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीयांचा डंका

05 Jul 2024 19:01:49
- अनेक नेते विजयी
 
लंडन, 
British election ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक भारतीयांनी यश मिळविले आहे. निवडणुकीत भारतीय वंशाचे 26 नेते हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले आहेत. ब्रिटनमधील अनेक कंझर्व्हेटिव्ह नेत्यांना यावेळी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दणदणीत पराभव होऊनही ब्रिटिश भारतीयांनी रिचमंड आणि नॉर्थलर्टन जागा राखण्यात यश मिळवले. ऋषी सुनक यांनी रिचमंड आणि नॉर्थलर्टन येथील लोकांचे आभार मानले आहेत. इतर भारतीय वंशाच्या नेत्यांमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सुएला ब्रेव्हरमन आणि प्रीती पटेल विजयी झाल्या आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे गगन मोहिंद्र यांनी सिथे वेस्ट हर्टफोर्डशायर जागेवर विजय मिळवला. सुनक यांच्या पक्षाच्या शिवानी राजाने लिसेस्टर येथे मजूर पक्षाचे भारतीय वंशाचे नेते राजेश अग्रवाल यांचा पराभव केला आहे.
 
 
British election
 
British election : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचे अनेक भारतीय वंशाचे नेतेही विजयी झाले आहेत. मजूर पार्टीच्या सीमा मल्होत्रा यांनी फेल्थम आणि हेस्टन जागा जिंकल्या आहेत. याच पक्षाच्या व्हॅलेरी वेज यांनी वॉल्सॉल आणि ब्लॉक्सविच मतदारसंघात विजय मिळवला. विगन मतदारसंघातून लेबर पार्टीच्या लिसा नंदी विजयी झाल्या आहेत. लेबरच्या प्रीत कौर गिलने बर्मिंगहॅम एजबॅस्टन जिंकले आहे. याशिवाय, स्लोग मतदारसंघातून तनमजितसिंग यांनी विजयाचा झेंडा फडकावला. स्टॉकपोर्टच्या जागेवर नवीनंदू मिश्रा आणि नॉटिंघम पूर्व जागेवर नादिया व्हिटोम विजयी झाल्या आहेत.
मजूर पक्षाच्या तिकिटावरही विजय
या निवडणुकीत अनेक ब्रिटिश भारतीय नागरिक नवीन चेहरे म्हणून लेबर पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. यात आयफोर्ड साऊथमधून जस अठवाल, डर्बी साऊथमधून बेगी शंकर, साऊथहॅम्प्टन टेस्ट सीटवरून सतवीर कौर, हडर्सफील्ड सीटवरून हरप्रीत उप्पल, व्होल्व्हरहॅम्प्टन वेस्टमधून वरिंदर जस, स्मेथविक सीटवरून गुरिंदर जोसन, वेले ऑफ ग्लॅमॉर्गन येथून कनिष्क नारायण, डडलेमधून सोनिया कुमार यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0