सत्संगात स्मशान!

05 Jul 2024 05:15:54
अग्रलेख
Hathras-stampede-Bhole देशात गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटना आणि त्यात शेकडो बळी गेले असताना गर्दीचे व्यवस्थापन करण्यात आपण अजूनही कमी पडतो आहोत. एखादी घटना घडली की राज्यकर्ते आणि प्रशासनाने अश्रू ढाळायचे, चौकशीचे आदेश द्यायचे आणि चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर निष्कर्ष पाहून धोरण ठरवण्याऐवजी बासनात गुंडाळून ठेवायचे, ही रीत झाली आहे. Hathras-stampede-Bhole परवा उत्तरप्रदेशमध्ये असेच काही घडले. उत्तरप्रदेशमधील हाथरस कायम या ना त्या कारणाने चर्चेत असते. मागे येथे एका दलित युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे प्रकरण देशभर गाजले होते. आताही सिकंदरराव येथे आयोजित सत्संगात शेकडो बळी गेल्याने हाथरसची चर्चा सुरू आहे. Hathras-stampede-Bhole देशात गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटना आणि त्यात शेकडो बळी गेले असताना गर्दीचे व्यवस्थापन करण्यात आपण अजूनही कमी पडतो आहोत. मराठीमध्ये ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा' अशी म्हण आहे; परंतु प्रशासन आणि राज्यकर्ते ती सोयीस्कररीत्या विसरतात.Hathras-stampede-Bhole  पुन्हा ठेच लागल्यानंतरही समोर पाहून चालायचे लक्षातच राहात नाही. हेही वाचा : शरद पवारांचा छुपा चेहरा सुप्रिया सुळे
 

Hathras-stampede-Bhole 
(घटना स्थळावर कोण्या चिमुकल्याच्या गळ्यातून पडलेले हे भोले बाबाचे लॉकेट) 
 
Hathras-stampede-Bhole हाथरसच्या घटनेनंतर आयोजकांपासून प्रशासकीय अधिकाèयांपर्यंत कोणाची जबाबदारी निश्चित होणार, असा सवाल समोर उभा राहतो. या चेंगराचेंगरीत निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण, एवढा मोठा निष्काळजीपणा कसा काय घडला, प्रशासनाने आयोजकांना सत्संगाला उपस्थित असलेल्या लोकांची संख्या का विचारली नाही, भोले बाबांचे पूर्वीचे कार्यक्रम पाहता यावेळी किती गर्दी होणार, याचा अंदाज आला नाही का? Hathras-stampede-Bhole सत्संग संपल्यानंतर अचानक जमाव बाहेर कसा येऊ लागला, गर्दीला बाहेर पडण्यासाठी सत्संगाच्या ठिकाणी स्वतंत्र दरवाजे का ठेवले गेले नाहीत? सत्संग संपल्यानंतर भोले बाबांचा ताफा तिथून का निघून गेला? असे प्रश्न अनेक आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असले, तरी या आणि अन्य मुद्यांची चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार आहेत. Hathras-stampede-Bhole हाथरस चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ती राज्य सरकारला लवकरच अहवाल देणार आहे. आता या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असली, तरी ज्यांच्या सत्संगासाठी गर्दी झाली होती, त्यांचे नाव या फिर्यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 हेही वाचा : आता 'ब्रेकअप'ला माफी नाही...!
 
 
गर्दीत चेंगराचेंगरी होते, तेव्हा दुर्बलांचाच बळी जातो. मुंबई, मांढरदेवी, मक्का, मदिना, वैष्णोदेवी किंवा अन्य ठिकाणची उदाहरणे घेतली तर महिला आणि लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते, असे लक्षात येते. Hathras-stampede-Bhole हाथरसमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सत्संगासारख्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी कानाकोपऱ्यातून जमलेल्या संगतीमध्ये एवढा मोठा नरसंहार घडेल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. या घटनांमधील गर्दीचे मानसशास्त्र समजून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा मोठ्या घटनांमध्ये कोणत्याही वेळी गर्दीचे मानसशास्त्र समजून घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याची योजना आखणे आवश्यक आहे. गर्दीतील सदस्य नेहमीच एखाद्या विषयावर मत मांडत असले, तरी त्यांचे वैयक्तिक विचार आणि कार्यशैली वेगळी असते; परंतु मोठ्या संख्येने लोक जमतात, तेव्हा स्थिरतेचा अभाव असतो. Hathras-stampede-Bhole ते एका वेगळ्याच प्रकारच्या थराराने प्रेरित झालेले असतात. जमावाचे मानसशास्त्र समजून घेतले तर गर्दीमुळे जेवढी चिडचिड होण्याची शक्यता असते, तेवढीच सुरक्षा व्यवस्था पाळण्याचीही भावना असते; परंतु केवळ स्थिरतेच्या अभावामुळे, विशिष्ट परिस्थितीत सक्रिय जमाव निष्क्रिय गटात बदलतो. हेही वाचा : ब्रेकिंग न्यूज...नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे!
 
 
 
हेही वाचा : ऋषी सुनक यांची जागा घेणारे केयर स्टारर आहे तरी कोण? या गर्दीत अस्वस्थता पसरल्याने चेंगराचेंगरीसारख्या घटना घडतात. सामाजिक मानसशास्त्रात जमावाची मानसिकता, झुंड मानसिकता, समूहविचार किंवा गर्दीचे मानसशास्त्र असे त्याचे वर्णन केले आहे. १९५० च्या दशकात, संशोधकांनी सामाजिक नियमांशी सुसंगत होण्यासाठी लोक आपले वर्तन किती सहज बदलतात, याचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष प्रयोग केला. या प्रयोगात आढळून आले की, सात जणांच्या गुप्त गटात एका त्रयस्थ व्यक्तीला बसवून प्रश्न विचारला असता, त्या गटाने चुकीचे उत्तर दिले. चुकीच्या उत्तराने तोही प्रभावित झाला. Hathras-stampede-Bhole या प्रयोगात गुप्त सहकाऱ्यांनी मुद्दाम चुकीचे उत्तर दिले होते; मात्र त्या व्यक्तीला योग्य उत्तर माहीत असूनही त्याने चुकीचे उत्तर दिले. या उदाहरणावरून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या रोजच्या जीवनात गर्दीचा कसा परिणाम होतो हे समजले पाहिजे, हे लक्षात येते. गर्दीची मानसिकता आपल्याला अनेकदा चुकीच्या दिशेने खेचते. आपण खेळ, सत्संग किंवा कोणत्याही स्पर्धेत सहभागी होत असतो, तेव्हा मानसिकता जुळण्याची टक्केवारी आणखी वाढते. एकत्र भजन गाणे, टाळ्या वाजवणे, जयजयकार करणे याने आपल्यातील उत्साहाची पातळी वाढते. उत्साहाची ही स्थिती विचारांच्या पातळीवर लोकांना एकमेकांशी जोडते आणि क्रियाकलापांच्या पातळीवर वेगळे करते. हेही वाचा : सत्संगात स्मशान!
 
 
 
Hathras-stampede-Bhole हाथरस येथे भोले बाबा सत्संग आटोपून कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. दर्शन घेण्यासाठी आणि बाबांच्या पायाची धूळ घेण्यासाठी अनुयायी भोले बाबांच्या गाडीच्या मागे धावले. त्याच वेळी मागून गर्दीचा दबाव वाढल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात लोक एकमेकांवर पडू लागले. पावसामुळे घटनास्थळाभोवती चिखल झाला होता. त्यामुळे लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. गर्दीत पडून, चिरडून अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्याला सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले असले, तरी तो फुकाचा दम ठरू नये. Hathras-stampede-Bhole घटनास्थळी किमान एक लाख लोक होते आणि बाबा निघू लागले, तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी गर्दी झाली. लोक परत येत असताना घसरून एकमेकांवर पडू लागले. कारण जवळच्या नाल्यातून वाहत असलेल्या पाण्यामुळे जमिनीचा काही भाग दलदलीचा झाला होता. या प्रसंगी कार्यक्रमस्थळी केलेली व्यवस्था जमलेल्या गर्दीच्या आकारासाठी अपुरी होती. चिखलात घसरल्याने लोक एकमेकांवर पडले आणि मागून येणाऱ्या  जमावाने त्यांना तुडवले. स्थानिक प्रशासनाने कार्यक्रमस्थळाच्या बाहेर सुरक्षा पुरवली होती. Hathras-stampede-Bhole अंतर्गत व्यवस्था आयोजकांना पाहावी लागते. या कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरीमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांपासून आयोजकांपर्यंत सर्वांचीच तारांबळ उडाली. व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हेही वाचा : जसप्रीत बुमराहचे निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य!
 
 
 
या सत्संगासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे; परंतु सत्संगस्थळी येणाèया गर्दीचा अंदाज त्यांनाही आला नाही. अशा स्थितीत चूक कुठे झाली आणि या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, हे समितीचा अहवाल आल्यानंतर समोर येईल. या अहवालात पोलिस, प्रशासन आणि आयोजक यांच्यापैकी कोणी कसूर केली, हे उघडकीस आल्यास कायद्यानुसार शिक्षा होईल. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर निरपराधांच्या हत्येची कारवाई केली जाऊ शकते. भारतीय न्याय संहिता २०२३ मध्ये दिलेले कलम १०५ दोषी मनुष्यवधाची व्याख्या करते. त्याच्या शिक्षेचा उल्लेख कलम १०५ मध्ये करण्यात आला आहे. प्रशासनाने कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली असल्याने हाथरस जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी होईल. तेथे सुरक्षा व्यवस्था केल्याचे अधिकारी सांगत आहेत; मात्र सर्व चोख बंदोबस्त असताना चेंगराचेंगरी कशी व का झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होते. गर्दीचा अंदाज आणि व्यवस्थापनात मोठी त्रुटी नाकारता येत नाही. तपासात दोषी आढळल्यास अधिकाèयांवर प्रशासकीय कारवाई निश्चित आहे. आयोजकांपैकी काहींना अटक झाली आहे, हे बरेच झाले. हाथरसच्या या भीषण घटनेतून प्रशासकीय यंत्रणा काय धडा घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0