ब्रेकिंग न्यूज...नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रशांत बोकारे!

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी दुसऱ्यांदा निलंबित

    दिनांक :05-Jul-2024
Total Views |
नागपूर, 
Nagpur University Vice-Chancellor राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी गुरुवारी डॉ. चौधरी यांना, त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी मुंबईतील राजभवनावर बोलाविले होते. डॉ. चौधरी यांनी लेखी उत्तर दिले. त्यानंतर राज्यपालांनी कायदेशीर बाजू तपासून कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निलंबित केले. यापूर्वीच्या निलंबनाला कुलगुरू चौधरी यांनी हायकोर्टातून स्थगिती मिळविली होती, हे विशेष. दरम्यान मध्यरात्री घडलेल्या घडामोडीनुसार, गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी यांनी नागपूर विद्यापीठाचा पदभार स्वीकारला आहे. रात्री उशिरा विकास कुलगुरूंनी त्यांना नागपूर विद्यापीठाचा कारभार हाती घेण्यास सांगितले.  हेही वाचा : ऋषी सुनक यांची जागा घेणारे केयर स्टारर आहे तरी कोण?
 
 
nagpur
 
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाला भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी कुलगुरूंविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार केली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंविरोधात आंदोलन केले होते. Nagpur University Vice-Chancellor त्याअनुषंगाने राज्यपाल रमेश बैस यांनी चौधरी यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पूर्ण होत असतानाच कुलगुरू डॉ. चौधरी यांनी चौकशी प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. चौधरी यांच्या वतीने मागील आठवड्यात शुक्रवारी याचिकेवर सुनावणीसाठी प्रयत्न झाले. मात्र काही कारणांमुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मुख्य न्यायपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर सोमवारी न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर प्रकरण आले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने याचिका फेटाळण्याची विनंती केली. चौधरी यांनी मागील वेळी चौकशी नियमानुसार झाली नसल्याचा दावा करीत याचिका केली होती. यावेळी सर्व नियमांचे पालन करून चौकशी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
 
चौधरी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देखील दिली जात आहे. केवळ कारणे द्या नोटीसच्या आधारावर ही याचिका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बाब बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला, तर दुसरीकडे चौधरी यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सोमवारी निर्णय राखून ठेवला. यानंतर या याचिकेवर मंगळवारी न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. Nagpur University Vice-Chancellor न्यायालयाने सुभाष चौधरी यांच्या चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चौधरी यांना चौकशीला सामोरे जावे लागणार, हे निश्चित झाले होते. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी डॉ. चौधरींनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी राज्यपालांना दोन दिवसांची वैद्यकीय रजा मागितल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आज गुरुवारी राज्यपाल व कुलपती रमेश बैस यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना दुसऱ्यांदा निलंबित केले. हे निलंबन करताना सर्व कायदेशीर बाजू तपासण्यात आल्याचा दावा राज्यपाल कार्यालयाने केला. त्यामुळे कुलगुरूंना या निर्णयाला आव्हान देणे शक्य नसल्याचे विद्यापीठ वर्तुळात बोलले जात आहे. हेही वाचा : शरद पवारांचा छुपा चेहरा सुप्रिया सुळे