तुम्ही तुमच्या चिमुकल्याला 'फास्टफूड' देता का?

05 Jul 2024 09:27:11
नवी दिल्ली,
fast food बदलती जीवनशैली आणि फास्टफूडचा विपरित परिणाम हा शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यावरही होत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन ते चार वर्षांत मानसिक समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ११ ते १६ वयोगटातील नैराश्याने ग्रासलेल्यांची संख्या वाढते आहे. फिनलँड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार लहान मुलांमध्ये ‘डिप्रेशन'ची वाढ झपाट्याने होत आहे. जसे सर्दी आणि खोकल्याचे इन्फेक्शन पसरत जाते, त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये ‘डिप्रेशन' मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फास्टफूडमध्ये असणारे घटक शरीरातील मेद वाढवतात. त्यामुळे जडपणा येतो. हालचाली मंदावतात. उत्साह न वाटल्याने उदासीनता वाढते. पर्यायाने एकाच जागी बसून राहण्याचा प्रकार वाढू लागतो. ही ‘डिप्रेशन'ची पहिली पायरी ठरते. हेही वाचा : ऋषी सुनक यांची जागा घेणारे केयर स्टारर आहे तरी कोण?
 
 
waere
 
हेही वाचा : सत्संगात स्मशान! मानसिक ताण-तणाव वाढला की, त्याचा परिणाम शरीरावरही जाणवतो. वेळेवर न जेवणे, जेवताना खाण्याकडे लक्ष न देणे यामुळे शरीराच्या वाढीसाठी हवे असलेले आवश्यक घटक अंगी लागत नाही. बèयाच जणांना तणावामध्ये असल्यावर जेवण जात नाही, त्यामुळे जरा काही खाल्ले तरी उलट्या होतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याचा परिणाम म्हणजे शरीराला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. fast food लहान मुलांचे मन नाजूक असते. कमी वयातच जवळचे कुणी दुरावले, अभ्यासाचे दडपण, कोणी जवळचे जगातून निघून गेले, तर याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. लहान मुले मनातील पटकन कुणाला सांगत नाही. ते मन रमवण्यासाठी मोबाईल, टीव्ही पाहणे, सोबत फास्टफूड हा सोपा पर्याय निवडतात. हेही वाचा : शरद पवारांचा छुपा चेहरा सुप्रिया सुळे
 
लहान मुलांमध्ये वाढणारी ‘डिप्रेशन'ची लक्षणे
सतत थकवा येणे
भूक न लागणे
पुरेशी झोप न घेणे
चीडचीड होणे
आत्महत्येचे विचार
सतत डोकेदुखी
उपाय काय? 
 
  • पालकांना वेळ देणे जमत नसल्यास मुलांना चांगल्या छंदांमध्ये मन, वेळ गुंतविण्यास शिकवावे.
  • मुलांना मोबाईल, संगणकापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
  • शिक्षकांनीही मुलांच्या सवयींवर लक्ष ठेवून त्यांना बुद्धीचे खेळ, मैदानी खेळ, सामूहिक प्रकल्पांत गुंतवले पाहिजे.
  • मुलांच्या चांगल्या प्रयत्नांचे पालक, शिक्षकांनी वेळोवेळी कौतुक केले पाहिजे. त्यामुळे सकारात्मकता वाढते.
  • तज्ज्ञांच्या मते, यावर उपाय पालकांनी मुलांना जास्तीत जास्त वेळ देणे हाच आहे.

    Powered By Sangraha 9.0