सामर्थ्यशाली भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान!

06 Jul 2024 18:19:31
रोखठोक
- हितेश शंकर
Asaduddin Owaisi : यंदा संसदेत वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा मोडीत काढत काही नारे, घोषणा निनादल्या. या घोषणांंसोबत इतिहासाचा गडगडाट आणि काही महापुरुषांच्या शिकवणुकीचा लखलखाटही झाला. भारतीय लोकशाहीला सावध करणारा तो गडगडाट होता. तसेच हिंदूंचा पुढील काळ किती कठीण आणि आव्हानात्मक राहणार आहे, हे आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरून तसेच संसदेतील काहींच्या भाषणावरून स्पष्टपणे प्रतिबिंबित होत होते.
 
 
Ovesi
 
शपथविधी सोहळ्यात काही नवनिर्वाचित खासदारांनी सभागृहात भाषणे केली, तर काहींनी विविध नारे दिले. प्रदीर्घ कालावधीनंतर विरोधकांचा आत्मविश्वास जागृत झाल्याने हा उत्साह समजण्यासारखा आहे. मात्र हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर जे नारे दिले त्याकडे मुळीच दुर्लक्ष करता येणार नाही. उलट देशवासीयांनी संपूर्ण सावधगिरी बाळगून या घडामोडीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
 
 
Asaduddin Owaisi : पहिली गोष्ट म्हणजे, खासदार म्हणून ओवेसी यांनी पहिल्यांदाच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. माझ्या गळ्यावर सुरी जरी ठेवली तरी मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे त्यांनी 2016 मध्येही म्हटले होते. तसेच ‘‘योगी कायम मुख्यमंत्री आणि मोदी कायम पंतप्रधान राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आम्ही आता शांत बसलो आहोत. पण तुमचे अत्याचार आम्ही विसरणार नाही’’ अशी उघडउघड धमकी दोन वर्षांपूर्वी ओवेसी यांनी कानपूरच्या रॅलीत पोलिसांना दिली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आज ओवेसी ज्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहेत त्याचा वैचारिक आधार आणि इतिहास हिंदूंबद्दलचा द्वेष आणि रक्ताने माखला आहे. या राजकीय समुहाचा वैचारिक वारसा तोच आहे, ज्याने या देशाच्या संस्कृतीला पायदळी तुडवण्याचे विष पोसले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या वेळी देशभरात ब्रिटिशांची सत्ता हटविण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ सुरू होती तेव्हा हैदराबादच्या निजामाने आपली निष्ठा गोर्‍या साहेबांच्या चरणांशी वाहिली होती. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी निजामाने ‘वंदे मातरम्’ आंदोलनावर बंदी घातली तेव्हा एमआयएमने (एआयएमआयएमचे जुने नाव) त्याला पाठिंबा दिला. त्या वेळी, बहादूर यार जंग नामक एक कट्टरपंथी एमआयएम (1938-44) चा अध्यक्ष होता, ज्याला एआयएमआयएम आपला सर्वात महान नेते म्हणून संबोधते. त्यानंतर जेव्हा हैदराबादच्या भारतात विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा एमआयएमचा अध्यक्ष सय्यद कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली फुटीरतावादी, दहशतवादी मुस्लिम रझाकारांनी हिंदूंची भीषण कत्तल केली.
 
 
निजामाची राजवट सुरूच राहिली पाहिजे. हैदराबाद संस्थानचे भारतात कधीही विलीनीकरण होऊ नये, अशी सय्यद कासिम रझवीची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळे रझवीचा निजामाला संपूर्ण पाठिंबा होता. एवढेच नव्हे तर हैदराबाद संस्थानने पाकिस्तानात सामील व्हावे, यासाठी सय्यद कासिम रझवी व त्याची रझाकार संघटना निजामावर दबाव आणत होती. पण रझवीचे मनसुबे उधळले गेले. मग मात्र त्याने निजामाला बंड करण्यास प्रवृत्त केले आणि ‘लेखणीच्या एका फटक्याने मरण्यापेक्षा हातात तलवार घेऊन मृत्यू पत्करणे केव्हाही चांगले’ असा ‘संदेश’ देत रझाकारांना हैदराबादच्या भारतात विलीनीकरणास विरोध करण्याचे आदेश दिले. 1948 मध्ये ‘ऑपरेशन पोलो’ नंतर एमआयएमवर बंदी घालण्यात आली होती. कासिम रझवीला (1948-57) तुरुंगात टाकण्यात आले आणि जर तो पाकिस्तानात जाणार असेल तरच त्याला सोडण्यात येईल, या अटीवर त्याची सुटका करण्यात आली. मात्र, पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी या रझवीने Asaduddin Owaisi असदुद्दीन ओवेसी यांचे आजोबा अब्दुल वाहिद ओवेसी यांच्याकडे पक्षाची संपूर्ण जबाबदारी सोपवली होती. असा हा ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाचा इतिहास आहे. ज्या पक्षाने रझाकारांना हिंदूंची कत्तल करण्यास प्रवृत्त केले, जातीय हिंसाचार पसरविण्यासाठी मोहीम सुरू केली त्याच पक्षाचे नेतृत्व आज असदुद्दीन ओवेसी करीत आहेत. आपल्या पक्षाच्या कलंकित इतिहासाबद्दल आणि हिंदूंच्या क्रूर, रानटी हत्यांबद्दल त्यांनी आजपर्यंत कधीही पश्चाताप व्यक्त केला नाही. उलट आजही त्यांची वृत्ती, मग ती पोलिसांना धमकावणारी असो वा संसदेत ‘पॅलेस्टाईन झिंदाबाद’चा नारा देत असो,
 
 
या देशाच्या राज्यकारभाराला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आहे. ज्या पक्षाचे आणि त्यांच्या नेत्यांचे हृदय भारतातील लोकांसाठी द्रवत नाही, कत्तल केलेल्या हिंदूंबद्दल ज्यांना जराही सहानुभूती नाही ते पॅलेस्टाईनच्या लोकांबाबत एवढे हळवे व संवेदनशील कसे होऊ शकतात, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. या पक्षाच्या कलंकित इतिहासाव्यतिरिक्त, घटनात्मक पदावर असताना ‘पॅलेस्टाईन’ किंवा इतर कोणत्याही देशाशी निष्ठा प्रदर्शित करणे हे देखील खासदार म्हणून अपात्र ठरविण्याचे कारण ठरू शकते, कारण घटनेचे कलम 102 (1) (डी) याला परवानगी देत नाही.
 
 
Asaduddin Owaisi : आणखी एक म्हणजे, आज जे ओवेसी ‘जय भीम’, ‘जय मीम’चा नारा देत आहेत ते नामवंत शैक्षणिक संस्थांमधील दलितांचा (भीम) कोटा मुस्लिम (मीम) खात असताना गप्प कसे राहतील? खरे तर या घोषणांमधील फसवणूक किंवा पोकळपणा हा डॉ. बाबासाहेबांच्या प्रखर विचारांच्या प्रकाशात समजून घेतला पाहिजे. वस्तुस्थिती ही आहे की मुस्लिम ब्रदरहूड ही केवळ मुस्लिमांच्या हितसंबंधांच्या रक्षणापुरतीच मर्यादित असलेली संकीर्ण, संकुचित संकल्पना आहे.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या Pakistan or the Partion of India या पुस्तकात याबद्दल सविस्तर लिहिले आहे. ते लिहितात की ‘मुस्लिम बंधुता’ (उम्मा) ही एक अशी बंदिस्त संस्था आहे जी मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यात भेदभाव करते. ती पूर्णपणे मूर्त आणि सुस्पष्ट आहे. इस्लामचा बंधुभाव हा मानवतेचा बंधुभाव नसून तो केवळ मुसलमानांचा मुसलमानांसाठी बंधुभाव आहे. हा बंधुभाव आहे, पण त्याचे फायदे केवळ स्वतःच्या समाजातील लोकांपुरते मर्यादित आहेत आणि जे या समुदायाच्या बाहेर आहेत त्यांच्याविषयी केवळ द्वेष, घृणा आणि शत्रुत्व आहे. या देशाबाहेर इतर देशात जरी मुसलमान असले तरी आपण एक आहोत, ही उम्मा किंवा बंधुत्वाची संकल्पना मानवतेवर आधारित नसून वंश आणि धर्मावर आधारित आहे. केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाखेरीज कोणत्याही खासदाराने देशाबाहेर निष्ठा प्रकट करणे अत्यंत धोकादायक आहे कारण असे करणे म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हान देणे होय.
 
 
असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर संतप्त झालेल्या काही लोकांनी त्यांच्या दिल्लीतील खासदार निवासस्थानाला काळे फासल्याचेही वृत्त आहे. या मुद्यावरचा जनक्षोभ आणि त्यामागचे कारण समजण्यासारखे आहे, पण अशाप्रकारची उपद्रवी घोषणा देणार्‍याला प्रत्युत्तरादाखल एक प्रश्न विचारलाच पाहिजे की, घटनात्मक पदावर असताना या देशाच्या संविधानाला आणि देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देता येईल का?

Asaduddin Owaisi : ज्या पक्षाने रझाकारांना हिंदूंची खुलेआम कत्तल करण्यास प्रवृत्त केले, जातीय हिंसाचार पसरविण्यासाठी मोहीम सुरू केली त्याच पक्षाचे नेतृत्व आज असदुद्दीन ओवेसी करीत आहेत. आपल्या पक्षाच्या कलंकित इतिहासाबद्दल आणि हिंदूंच्या क्रूर, रानटी हत्यांबद्दल त्यांनी आजपर्यंत कधीही पश्चाताप व्यक्त केला नाही. उलट आजही त्यांची वृत्ती व कृती, मग ती पोलिसांना धमकावणारी असो वा संसदेत ‘पॅलेस्टाईन झिंदाबाद’चा नारा देणारी असो, या देशाचे प्रशासन आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणारी आहे.
1948 मध्ये ‘ऑपरेशन पोलो’ नंतर एमआयएमवर बंदी घालण्यात आली होती. कासिम रझवीला (1948-57) तुरुंगात टाकण्यात आले आणि जर तो पाकिस्तानात जाणार असेल तरच त्याला सोडण्यात येईल, या अटीवर त्याची सुटका करण्यात आली. मात्र, पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी या रझवीने असदुद्दीन ओवेसी यांचे आजोबा अब्दुल वाहिद ओवेसी यांच्याकडे पक्षाची संपूर्ण जबाबदारी सोपवली होती. असा हा ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाचा इतिहास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या Pakistan or the Partion of India या पुस्तकात लिहितात की, ‘मुस्लिम बंधुभाव’ (उम्मा) ही एक अशी बंदिस्त संस्था आहे जी मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यात भेदभाव करते. ती पूर्णपणे मूर्त आणि सुस्पष्ट आहे. इस्लामचा बंधुभाव हा मानवतेचा बंधुभाव नसून तो केवळ मुसलमानांचा मुसलमानांसाठी बंधुभाव आहे. हा बंधुभाव आहे, पण त्याचे फायदे केवळ स्वतःच्या समाजातील लोकांपुरते मर्यादित आहेत आणि जे या समुदायाच्या बाहेर आहेत त्यांच्याविषयी केवळ द्वेष, घृणा आणि शत्रुत्व आहे. ही उम्मा किंवा बंधुत्वाची संकल्पना मानवतेवर आधारित नसून वंश आणि धर्मावर आधारित आहे.
Powered By Sangraha 9.0