बिहारवासियांची ‘दादी मां' रमादेवी !

Bihar-MP-Ramadevi खुर्ची सगळं शिकवते

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
नेत्री
 
 
- शायना एनसी
 
Bihar-MP-Ramadevi बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज शहरातील ही गोष्ट ! लग्नाच्या वेळी इंजिनियरींग करणाऱ्या जावयाला शिकविण्याचा खर्च मुलीच्या वडीलांनी उचलायचा, हे ठरलं आणि त्याच अटीवर लग्न झालं. Bihar-MP-Ramadevi जावईबापूंचं शिक्षण पूर्ण होत असताना, मुलीच्या वडीलांनी खर्च देणार नाही, असं स्पष्ट केलं. यामागचं कारणही विचार करण्यासारखंच होतं. Bihar-MP-Ramadevi आपला राजबिंडा जावई जास्त शिकून, दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटेल आणि आपल्या लेकीला सोडून देईल, अशी काळजी अगदी सहज त्या वडीलांना वाटली. पण, त्या पदवीधर मुलीने विचार केला की, शिक्षण असं अर्ध्यावर सोडायला नको. Bihar-MP-Ramadevi नवऱ्याच्या शिक्षणासाठी पैशांची सोय तर व्हायलाच हवी म्हणून, तिने शिक्षिकेची नोकरी केली, ट्युशन्स घेतल्या. मिळणारा पैसा ती नवऱ्याला शिक्षणासाठी पाठवत राहीली. त्यानेही शिक्षण पूर्ण करून, पत्नीच्या श्रमाचं चीज करीत सुखाने संसार केला. मंडळी, ही एखाद्या कादंबरीतील गोष्ट नाही तर ही संघर्षगाथा आहे बिहारच्या शिवहरमधून खासदार झालेल्या रमादेवी यांची!Bihar-MP-Ramadevi
 
 

Bihar-MP-Ramadevi 
 
 
५ मे १९४९ रोजी कैलाशप्रसाद आणि धनभरनदेवी चौधरी या मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पोटी लालगंजमध्येच रमादेवींचा जन्म झाला. अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी घेतली आणि नंतर लॉ केलं. त्यांचं शिक्षण मुजफ्फरपूरमध्ये झालं. ७ जुलै १९६५ रोजी त्या अभियंता ब्रिजबिहारी प्रसाद यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि वर्ष १९९८ मध्ये मोतिहारी मतदारसंघातून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली आणि त्या बाराव्या लोकसभेवर निवडून गेल्या. Bihar-MP-Ramadevi त्यानंतर, मोतिहारीमधूनच त्यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये त्या बिहारमधून लोकसभेवर निवडून गेल्या. पारदर्शी पद्धतीने, सामान्यजनांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याची दखल सामान्य जनता घेतेच, या सूत्रावर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे. जीवनाच्या विविध टप्प्यांवर संघर्ष करताना आपलं लक्ष्य निर्धारीत असेल तर आत्मबळाच्या जोरावर यश आपल्याला मिळतंच, असं त्या मोकळेपणाने सांगतात. आपल्या पदाची जबाबदारी आणि पदाची खुर्ची सगळं काही शिकवत असते.
 
 
 
 
Bihar-MP-Ramadevi संसदेत भाषण देत एखादा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यासाठी किंवा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना, अभ्यास करावाच लागतो. पण, त्यातूनच आपण शिकत जातो आणि स्वत:ला अपडेट करत असतो, असं रमादेवी आत्मविश्वासाने सांगतात. आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या माहिती असायला हव्यात आणि त्यासाठी जनसंपर्क खूपच महत्त्वाचा आहे, असं त्या सांगतात. त्यांच्या मतदारसंघातील लोकांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत आणि त्या ‘दादीमां' नावाने लोकप्रिय आहेत. शिक्षणाचं महत्त्व असं आहे की, मानवाला दोनच्या जागी चार डोळे असल्यासारखी दृष्टी मिळते. भूतकाळातील संघर्ष आणि घटनांचा संदर्भ घेत, भविष्याचा विचार करून आपलं जीवन घडविण्यासाठी शिक्षणच सहायक ठरतं, असं त्या स्वानुभवातून सांगतात. Bihar-MP-Ramadevi त्यांना पाच अपत्यं असून, सर्व जण उच्चविद्याविभूषित आणि विविध क्षेत्रांतील मोठमोठ्या पदांवर आहेत. आपल्या मतदारसंघात सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असतो, हे विशेष!
 
 
 
 
सर्वाधिक उपस्थिती, सर्वाधिक प्रश्न आणि दखलपात्र काम असल्यामुळे सर्वोत्तम संसदपटू हा पुरस्कार त्यांनी पटकावला आहे. घर आणि राजकारणाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं असल्याचा संदेश त्यांनी दिला. हसत हसत आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर यश आणि मन:शांती मिळते, हे त्या जीवनाचे सूत्र मानतात. बिहारमध्ये गरीबांच्या घरात शौचालयांचे काम झाल्याने महिलांची खूपच सोय झाली. Bihar-MP-Ramadevi पहाटेच्या अंधारात हातात लोटा घेऊन, शेतात-रानात त्यांना जावं लागायचं, समाजकंटकांच्या अत्याचाराला त्या बळी पडायच्या. शाळेत शौचालयं नसल्यामुळे मुली शिक्षण अर्धवट सोडून देत असत. मात्र, या सगळ्या समस्यांवर शौचालयांचा उपाय जालीम ठरला आणि सामाजिक जीवनात मोठे बदल घडले. तब्बल पाचवेळा खासदारकी, मंत्री पदं, आमदारकी आणि विविध समित्यांच्या सदस्यपदावर असल्या तरी जनतेच्या पैशांना त्यांनी कधीच हात लावला नाही.
 
 
 
Bihar-MP-Ramadevi मिळणाऱ्या खासदार निधीचा वापर लहानमोठ्या कामांसाठी आणि विशेषत: पूरस्थितीवरील उपाययोजनांवरील खर्चासाठी वापरला जाण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. मत्स्यपालन हा त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नाचा स्रोत आहे, याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्या परिश्रमाच्या जोरावर महिला खूप चांगलं काम करू शकतात. राजकारण हे पुरुषप्रभावित क्षेत्र असलं महिलांनाही आता बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. Bihar-MP-Ramadevi स्त्रीपुरुष समानतेवर भर देण्यासोबतच, मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी मात्र महिलांची आहे. आपल्या निश्चयावर ठाम राहून, लक्ष्यप्राप्तीसाठी प्रयत्न करा आणि राजकारण आवर्जून या, असं आवाहन त्या युवावर्गाला करतात.
 
भावानुवाद : रेवती जोशी-अंधारे