अर्जुनी मोरगाव,
Gondia-Navegaon Bandh नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात 4 जुलै रोजी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र तयार करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या युवकाला सरपंचानेच मारहाण केल्याची घटना घडली होती. Gondia-Navegaon Bandh दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. तर सरपंचांना पदमुक्त करण्याची मागणी पीडित युवक व नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले व कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

Gondia-Navegaon Bandh अर्जुनी मोरगाव पंचायत समितीअंतर्गत येणार्या नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात आशीष लंजे हा युवक जन्माचा दाखला मागण्यासाठी गेला होता. मात्र ग्रामपंचायत कार्यालयात दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी बघून तो बैठक सभागृहात बसला होता. अचानक सरपंचा हिरा नीलमचंद पंधरे यांनी आशिष लंजेजवळ जाऊन त्याच्या दोन वेळा कानशिलात लगावल्याची घटना 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घडली. Gondia-Navegaon Bandh आशीष सुभाष लंजे याने लगेचच नवेगावबांध पोलिस स्टेशनला जाऊन सरपंचा हिराबाई पंधरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तर आशिष लंजे यांनी पैशाचा हिशोब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे सरपंचा पंधरे यांनी पोलिसांजवळ कबूल केले. Gondia-Navegaon Bandh दरम्यान, सरपंच हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवली असून भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
Gondia-Navegaon Bandh विशेष म्हणजे, सरपंच हे गावचे प्रमुख व लोकप्रतिनिधी असून अशा प्रकारे शासकीय कार्यालयात मारहाण करने योग्य आहे का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. तसेच सामान्य जनतेवर अशा प्रकारे हात उगारणार्या किंवा मारहाण करणार्या लोकप्रतिनिधींवर जिल्हाधिकार्यांनी अपात्रतेची कार्रवाई करुन पदमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. Gondia-Navegaon Bandh 4 जुलै रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेस लागणार्या जन्म प्रमाणपत्रकरिता ग्रामपंचायत कार्यालयात गेलो. परंतु नागरिकांची गर्दी असल्यामुळे मी बाजुच्या सभागृहात बसलो होतो. अचानक सरपंच हीराबाई पंधरे माझ्याजवळ आल्या व माझ्या कानशिलात लगावली. लगेचच नवेगावबांध पोलिस ठाण्यात सरपंच हीराबाई पंधरे यांच्या विरोधात तक्रार केली असून गुन्हा नोंद झाला आहे. Gondia-Navegaon Bandh पुढील कारवाईकरिता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन अशा प्रकारे सामान्य नागरिकांवरती हात उगारणार्या लोकप्रतिनिधींना सरपंच पदावरुन पदमुक्त करावे अशी माझी मागणी असल्याचे आशिष लंजे यांनी म्हटले आहे.