बेरोजगारी, राजकारण आणि लोकसंख्या

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
वेध
- पुंडलिक आंबटकर
टॉप 10 मधून उसळी घेत भारतीय अर्थव्यवस्थेने टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये जम बसविला आहे. येत्या 5 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था क्रमांक 3 वर नेण्याचा विश्वास PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे. ही गर्वाची बाब असली तरी देशात लोकसंख्येचा विस्फोट झाल्याने बेरोजगारीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. मोदी संविधान बदलविणार असल्याची हाकाटी करून विरोधकांनी देशात वैचारिक अराजकता निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसंख्यावाढीला आळा घालणारा कायदा येण्याची शक्यता वाटत नाही. अशा प्रकारचा कायदा गठ्ठा मतदानाला सुरुंग लावणारा ठरू शकतो. भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. इतक्या कमी जागेत तब्बल 142 कोटी लोक राहतात!
 
modi
 
देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे सांगून काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरी घोषित केली आहे. मतांच्या लाचारीसाठी देशहिताशी केलेली ही तडजोड नव्हे काय? रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सर्वात मोठा देश आहे आणि या देशाची लोकसंख्या अवघी 14 कोटी आहे. भारताची लोकसंख्या सर्वाधिक असली, तरी क्षेत्रफळात भारत 7 व्या क्रमांकावर आहे. 32,87,263 वर्ग किलोमीटर इतकाच भूभाग भारताला लाभला आहे. त्यामुळे संसाधनांवर प्रचंड मर्यादा येतात. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारीसुद्धा झपाट्याने वाढत आहे. अमेरिका या विकसित राष्ट्राकडे 42,549,000 वर्ग किलोमीटर इतका भूभाग आहे. परंतु, त्यांची लोकसंख्या केवळ 35 कोटी आहे आणि त्यातही इतर देशांतील अनिवासी नागरिकांची संख्या भरपूर आहे. देशात आज हिंदू बहुसंख्य असले, तरी येत्या 30 वर्षांत मुस्लिमांची संख्या 35 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. भारताला 2050 पर्यंत गजवा-ए-हिंद करण्याचे आतंकवादी विचारसरणीच्या लोकांचे ध्येय आहे. या आतंकवादी विचारसरणीला भारतातीलच काही सत्तालोलूप नेते बेताल वक्तव्ये करून वारंवार खतपाणी घालत आले आहे.
 
 
सत्तेसाठी देशाचा, देशहिताचा आणि आपल्याच आगामी पिढ्यांचा बळी देणार्‍या अन्य राजकीय नेत्यांचे काय? नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने महिलांच्या खात्यात वर्षाकाठी 1 लाख रुपये जमा करण्याचे आमिष दाखविले. ही एक दिशाभूल करणारी घोषणा होती. परंतु, महिला मतदारांना आकर्षित करण्यात ही घोषणा यशस्वी ठरली. एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणानुसार उत्तरप्रदेशातील 72 टक्के मुस्लिम महिलांनी निव्वळ 1 लाख रुपयांसाठी काँग्रेस व सपा उमेदवारांना मतदान केले. मतांच्या लाचारीसाठी केलेली ही देशाची फसवणूक आहे. भारतात 60 कोटींपेक्षाही अधिक महिला राहतात. काँग्रेस सत्तेत आली तरी इतक्या महिलांना पैसा पुरवू शकेल का? पुरविलाच तर देशाच्या विकासाचे काय? देशाला पुढे न्यायचे आहे की पुन्हा अंधारात ढकलायचे आहे? बेरोजगारीचे मूळ कारण काँग्रेसने देशाला समजावून सांगितले पाहिजे. अवघ्या एका जागेसाठी हजारो अर्ज येतात. इतक्या लोकांना रोजगार कुठून देणार? त्यातल्या त्यात बहुतांश उमेदवारांना सरकारी नोकरी हवी आहे! मोदींच्या कार्यकाळात वशिला आणि भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. पूर्वी नोकर भरतीत प्रचंड भ्रष्टाचार चालायचा. परिणामी, लायक उमेदवारांवर अन्याय करून राजकीय नेत्यांच्या चेलेचपाट्यांना अथवा मोठी रक्कम भरणार्‍या दुय्यम उमेदवारांना नोकर्‍या दिल्या जायच्या. ही परंपरा PM Narendra Modi मोदींनी खंडित केली.
 
PM Narendra Modi : भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे. 142 कोटी लोकसंख्येच्या या देशात सर्वांना रोजगार काँग्रेस तरी पुरवू शकते का? महागाई वाढली, हे खरे असले तरी नागरिकांची मिळकतसुद्धा वाढली नाही का? एका घरी चार-पाच वाहने व सात-आठ मोबाईल आले. महिन्याला हजारो रुपयांचा रिचार्ज भरणारेही महागाई वाढल्याचे ऊर बडवून सांगतात, हे खूपच हास्यास्पद आहे. भारतात आजही शेतमालास पाहिजे तसा भाव नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकारला गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. शिवराजसिंह चौहान हे केंद्रीय कृषिमंत्री झाल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण आहे. केवळ सत्ता प्राप्त करणे हे भाजपाचे उद्दिष्ट असू शकत नाही. देशाला सुशासन देणे हा मूळ विचार भाजपाच्या स्थापनेत आहे. भाजपाचा उदय संघर्षातून झाला आहे. संघाला चिरडण्याचा प्रयत्न झाला नसता तर आजचा भाजपा हा पक्षच अस्तित्वात नसता! ‘‘सरकारे येतील आणि जातील परंतु देश टिकला पाहिजे, देशाची अस्मिता टिकली पाहिजे,’’ अटलजींच्या या वाक्याला अनुसरून प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने पुन्हा नव्या दमाने कार्यरत झाले पाहिजे. भाजपाची उपयोगिता कार्यकर्ते देशवासीयांना पटवून देण्यात यशस्वी झाले तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, रोखू शकणारही नाही... 
 
- 9881716027