शुभमन गिल इतिहास रचणार...कर्णधार म्हणून पहिला T20I सामना!

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Shubman Gill शुभमन गिलला २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्याला ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याने यापूर्वी कधीही टीम इंडियाचे नेतृत्व केले नाही. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक करताच तो इतिहास रचणार आहे. T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १३ खेळाडूंनी टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. वीरेंद्र सेहवाग हा भारतीय संघाचा पहिला कर्णधार होता. यानंतर महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ चा T२० विश्वचषकही जिंकला होता. सर्वाधिक T२०I सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा तो खेळाडू आहे. 
 

bnavgat 
अलीकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियासाठी सर्वाधिक T२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा रोहित हा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण 5५० T२०I सामने जिंकले आहेत. तर संघ फक्त १२  पराभूत झाला आहे. Shubman Gill शुभमन गिल हा T२० मध्ये कर्णधार असणारा भारताचा 14वा कर्णधार ठरणार आहे. भारतीय संघाला नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. भारत सध्या टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविजेता आहे. गिलने यापूर्वी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे. पण त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही आणि आठव्या क्रमांकावर उभा राहिला.
भारताचे नेतृत्व करणारे खेळाडू
वीरेंद्र सेहवाग
महेंद्रसिंग धोनी
सुरेश रैना
अजिंक्य रहाणे
विराट कोहली
रोहित शर्मा
शिखर धवन
ऋषभ पंत
हार्दिक पंड्या
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
रुतुराज गायकवाड
सूर्यकुमार यादव
टीम इंडिया
शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) , हर्षित राणा.