डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांची देशाला नितांत गरज

    दिनांक :06-Jul-2024
Total Views |
गडचिरोली, 
आज देशातीलdr shyamprasad mukherjee समाज जाती-जातीमध्ये विभागत असून जातीयवाद मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून आलेला आहे. अखंड भारताचे स्वप्न विसरून भारताचे तुकडे पाडण्याचा विचार काही असामाजिक तत्त्वांनी घेतलेला असून त्याला समाज बळी पडत आहे. हा देशासाठी मोठा धोका आहे. त्यामुळे जातीपातीचा विचार न करता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेल्या देशाची एकता व अखंडता सर्वतोपरी हा विचार ठेवून काम करावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
 
 

fhdfgh 
डॉ. श्यामाप्रसाद dr shyamprasad mukherjeeमुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, भाजपचे जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, युमो जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, उमेश कुकडे, लोमेश सातपुते, प्रकाश सरकार, दीपक दास, श्रीराम बिश्‍वास, देविदास कुणघाडकर, प्रभाकर कुकडे, भीमसेन पाल, चेतन कवाळकर, विजय कंदिकवार, निलो शेख, नुरी शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार होळी म्हणाले, भारतीय जनसंघाचे संस्थापक, कुशल संघटक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाची राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी अविरत संघर्ष केला. त्यांच्या संघर्ष व बलिदानामुळेच आज देश एकसंघ आहे. परंतु काही असामाजिक तत्त्व त्या विचारांना संपविण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे सर्वांनी जागरूक राहून देश हितासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.