उपचारासाठी पैसे नसल्याने 15 दिवसांच्या मुलीला जिवंत गाडले

    दिनांक :08-Jul-2024
Total Views |

jhafra
 
सिंध (पाकिस्तान),
girl was buried alive पाकिस्तानातील सिंध प्रांतात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बापाने आपल्या 15 दिवसांच्या मुलीला जिवंत गाडले, हा जघन्य गुन्हा करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी ही घटना ज्याला कळली त्याला धक्काच बसला. वृत्तसंस्था एएनआयने एआरवाय न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे की, आरोपी वडील तय्यबने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आर्थिक चणचण भासत त्यांनी आपल्या नवजात मुलीवर उपचार करणे शक्य नसल्याचे सांगितले. तय्यबने नवजात अर्भकाला दफन करण्यापूर्वी गोणीत बांधल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी तय्यबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या सूचनेनुसार मुलीची कबर पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी उघडली जाईल.