कपाटात बंकर तयार करून लपले होते दहशतवादी...व्हिडिओ

08 Jul 2024 09:35:52
जम्मू,
Kulgam encounter दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या दोन भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी रविवारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) च्या कमांडरसह आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 2022 मध्ये शोपियानमधील सफरचंदाच्या बागेत काश्मिरी हिंदू सुनील कुमार यांच्या टार्गेट किलिंगसह TRF कमांडर आदिल हुसैनचा अनेक डझनभर घटनांमध्ये सहभाग होता. दोन्ही चकमकीत आतापर्यंत एकूण सहा दहशतवादी ठार झाले आहेत. एक चकमक चिनीगाममध्ये तर दुसरी चकमक कुलगामपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मुदरगाममध्ये सुरू आहे.
 हेही वाचा : केदारनाथमध्ये भूस्खलनाचा अलर्ट...आवश्यक असेल तरच यात्रेला या!
 
xdvcdfty
 
मुदरगाममध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांनी घेराव घातताच आत लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.कुलगामच्या चिनीगाम भागात ज्या घरात दहशतवादी लपले होते, Kulgam encounter त्या घरात त्यांनी कपाटाच्या मागे तळघर बनवले होते. चकमकीत चार हिजबुल दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांनी घराची झडती घेतली असता त्यांना एक शौचालय सापडले. त्याचा वापर दहशतवाद्यांनी शस्त्रे आणि दारूगोळा लपवण्यासाठी केला. हेही वाचा : भारतीय संघाने पहिल्यांदाच केला हा पराक्रम
 
 
Powered By Sangraha 9.0