मुंबई कोकणात पावसाचा कहर...घराबाहेर पडू नका!

    दिनांक :08-Jul-2024
Total Views |
मुंबई,
Rain in Mumbai Konkan महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. कोकणात पावासाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर, राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. तर, एकीकडे आज पावसाळी अधिवेशनदेखील सुरू आहे. मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. चाकरमान्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झालेयत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचल आहे.
 
kokan
हेही वाचा : कपाटात बँकर तयार करून लपले होते दहशतवादी...व्हिडिओ जोरदार कोसळलेल्या पावसामुळे लोकल ट्रॅकवर पाणी साचले असल्याने याचा परिणाम लोकल सेवांवर झाला आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल उशीराने धावत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोकणातहि मुसळधार पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक तातडीने जारी करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरना दिले आहेत. Rain in Mumbai Konkan अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हेही वाचा : भारतीय संघाने पहिल्यांदाच केला हा पराक्रम
 
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस पडत आहे. जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलांडली आहे. यासह रायगड, महाड तालुक्यात देखील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक नद्या नाल्यांना पुर आला आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. Rain in Mumbai Konkan  मागील दोन दिवसापासून संततधार पाने पडणाऱ्या पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीने रविवारी सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे खेड शहरावर पुराचे संकट घोंघावत आहे. गेल्या 8 दिवसापासून इशारा पातळीच्या वरून वाहणाऱ्या जगबुडी नदीने अखेर रविवारी सायंकाळी धोका पातळी ओलांडली. यामुळे शहरातील व्यापाऱ्याची धावपळ उडाल्याचे पहावयास मिळत होते.