अकोला जिल्ह्यातील 16 मंडळांत अतिवृष्टी

09 Jul 2024 16:39:36
अकोला,
Heavy rains in Akola district जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात रविवार 7 जुलैच्या दुपारपासून दमदार हजेरी लावली. सोमवार, 8 जुलै रोजी दुपारी 12 पर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात सरासरी 54.5 मिमी पावसाची तर बाळापूर व अकोला तालुक्यातील 16 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. मोरगाव भाकरे येथे भिंत कोसळून मनोहर वानखडे यांचा मृत्यू झाला तर 83 घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उगवा-आगर मार्ग मोर्णा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत बंद होता. तर उरळ-झुरळ मार्गावरील वाहतूकही बंद होती.
 
 
bnako
 
रविवार दुपारपासून सोमवारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. तर बाळापूर व अकोला तालुक्यातील 16 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. अकोला तालुक्यात 24 तासात 90 मीमी पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद शिवणी मंडळात 163 मीमी करण्यात आली. तालुक्यातील भौरद व गायगावला जोडणार्‍या पुलावर पाणी होते.तर उगवा-आगर रस्त्यावर पाणी असल्याने हे दोनही मार्ग रविवारी दुपारपर्यंत बंद होते. Heavy rains in Akola district दरम्यान, तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील 60 वर्षीय मनोहर महादेव वानखडे यांचा घराची भिंत कोसळून मृत्यू झाला तर तालुक्यात दोन कच्च्या घरांचे नुकसान झाले. बाळापूर तालुक्यात सरासरी 90.6 मीमी पाऊस पडला. तालुक्यातील बाळापूर, पारस, व्याळा, वाडेगाव, उरळ आणि हातरुण मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
 
तालुक्यात 81 घरांचे अंशतः नुकसान झाले तर उरळ-झुरळ मार्ग पावसामुळे बंद होता. बार्शिटाकळी तालुक्यात सरासरी 53.9 मीमी पावसाची नोंद आहे. तालुक्यातील राजंदा मंडळात अतिवृष्टी झाली. आकोट तालुक्यात सरासरी 31.4 मिमी. पाऊस झाला. तालुक्यातील चोहोट्टा बाजार मंडळात अतिवृष्टी झाली. तेल्हारा तालुक्यात 46.6 मिमी., पातूर 37.2 मिमी. तर मूर्तिजापूर तालुक्यात 18.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. Heavy rains in Akola district अकोला तालुक्यातील शिवणी मंडळात 24 तासांत 163 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील 16 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यात शिवणी मंडळासह अकोला 110 मिमी, दहिहंडा 85.8 मिमी, कापशी 100.3 मिमी, उगवा 69.5 मिमी, आगर 69.8 मिमी., कौलखेड 164 मिमी, राजंदा 116.5 मिमी, चोहोट्टा बाजार 106 मिमी, बाळापूर 116.8 मिमी, पारस 111.5 मिमी, व्याळा 66.8 मिमी, वाडेगाव 66.8 मिमी, उरळ 100.8 मिमी. तर हातरुण येथे 79 मिमी पाऊस 24 तासांत झाल्याची नोंद आहे.
Powered By Sangraha 9.0