भारत हा धोरणात्मक भागीदार : अमेरिका

09 Jul 2024 21:23:17
वॉशिंग्टन, 
भारत हा धोरणात्मक भागीदार असून, त्याच्यासोबत आम्ही पूर्ण आणि मोकळेपणाने संवाद साधत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत होणार्‍या चर्चेच्या पृष्ठभूमीवर अमेरिकेने सांगितले. भारत हा धोरणात्मक भागीदार असून, त्याच्यासोबत आम्ही पूर्ण आणि स्पष्ट चर्चा करतो आणि त्यात त्यांच्या रशियासोबत असलेल्या संबंधांच्या चिंतेचाही समावेश आहे, असे अमेरिकी गृह विभागाचे प्रवक्ते Matthew Miller मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेसाठी मॉस्कोला गेलेल्या नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला मिलर उत्तर देत होते.
 
 
Matthew Miller
 
ज्या प्रमाणे हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली, त्याच दृष्टिकोनातून आम्ही या भेटीकडे पाहत आहोत. आम्हाला वाटते की, हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. रशियासोबत संबंध असलेल्या दुसर्‍या देशांप्रमाणेच आम्ही भारतालाही विनंती करतो की, युक्रेनच्याबाबती कोणताही तोडगा हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मसुद्याचा आदर करणारा असावा, तो युक्रेनच्या प्रादेशिक ऐक्याचा आणि सार्वभौमत्वाचा सन्मान करणारा असावा, असे मिलर यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी सार्वजनिकरीत्या काय बोलतात, त्याकडे आम्ही लक्ष देऊ. पण, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे भारताची रशियासोबतचे संबंध हे आमच्या काळजीचा विषय आहे, असे Matthew Miller मिलर यांनी म्हटले.
Powered By Sangraha 9.0