रशियन सैन्यात अडकलेले भारतीय मायदेशी परतणार

09 Jul 2024 17:52:48
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव
 
मॉस्को, 
pm Modi-Vladimir Putin : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन लष्करात अडकलेल्या भारतीयांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे उपस्थित केला. रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सैन्यात सेवा करणार्‍या सर्व भारतीयांना मायदेशी परतण्यास मदत करण्याचे मान्य केले आहे. अनेक भारतीयांना फसवून रशियन सैन्यात भरती केल्याचे समोर आले आहे. रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीय रशियन सैन्यात अडकले असून, अनेक भारतीय आघाडीवर तैनात आहेत. रशियाच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेले पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी सायंकाळी पुतिन यांच्यासोबत डिनरमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. ज्यावर पुतिन यांनी आपल्या सैन्यात सेवा करणार्‍या सर्व भारतीयांना बडतर्फ करून त्यांना भारतात परतण्यास मदत करण्याचे मान्य केले.
 
 
 Modi-Putin
 
pm Modi-Vladimir Putin : भारतीयांना फसवून रशियन सैन्यात भरती केल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आली होती. काही एजटांनी रशियात चांगल्या पगाराचे आमिष दाखवून सुमारे 24 भारतीयांना रशियामध्ये नेले. मात्र, तेथे त्यांना लष्करात सामावून घेतले. सध्या हे भारतीय तरुण युक्रेन युद्धात आघाडीवर तैनात आहेत. यावर्षीच्या प्रारंभी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात पंजाब, हरयाणातील काही लोक रशियन सैन्याच्या गणवेशात दिसत होते. व्हिडीओमध्ये या भारतीयांनी दावा केला होता की, युक्रेनमध्ये युद्ध करताना आपली फसवणूक झाली आहे. मायदेशी परतण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे आवाहन केले होते.
 
 
भारताने उपस्थित केला होता मुद्दा
pm Modi-Vladimir Putin : त्यानंतर भारत सरकारने रशियासमोर हा मुद्दा उपस्थित केला. फसवणूक करून आणि खोटी आश्वासने देऊन भारतीयांना परदेशात पाठवणार्‍या एजंटांवर कारवाई केली जाईल, असेही सरकारने म्हटले होते. भारतीय तपास यंत्रणांनी अशा एजंटांवर कारवाई केली आणि भारतीयांची तस्करी करणार्‍या टोळीचाही पर्दाफाश केला. या एजंटांनी किमान 35 भारतीयांना रशियात पाठवल्याचे तपासात उघड झाले होते.
Powered By Sangraha 9.0