पाक घुसखोराचा भारतात शिरण्याचा प्रयत्न!

01 Aug 2024 10:45:41
सांबा,
Pak intruder to enter India जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, आधीच सतर्क असलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये मोठी वाढ झाली आहे. माहितीनुसार, 31 जुलै/01 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री, सतर्क बीएसएफ जवानांना सांबा सेक्टरमध्ये सीमेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. एक घुसखोर कुंपणाकडे सरकत असल्याचे बीएसएफने पाहिले. बीएसएफच्या जवानांनी घुसखोराला ठार केले आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. हेही वाचा : हिमाचलमध्ये पावसाचा रौद्र रूप...व्यास नदीला पूर
  
 
samba
दुसरीकडे, भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या रोमियो फोर्सने हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा एक सहकारी मोहम्मद खलील याला पुंछमधील मगनरमध्ये ताब्यात घेतले आहे. Pak intruder to enter India तो पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. मोहम्मद खलील याच्याकडून एक विदेशी पिस्तूल सापडले आहे. एक सक्रिय पाक व्हॉट्सॲप नंबर शोधला गेला आहे ज्याद्वारे एक हँडलर त्याला कामावर ठेवायचा.भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी राजौरी सेक्टरमधील कालाकोट भागात एका लपलेल्या ठिकाणी संयुक्त कारवाई केली. येथून हंगेरियन AK-63D ​​शस्त्र जप्त करण्यात आले आहे. हेही वाचा : तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी चिमुकल्याला मारली थापड!
Powered By Sangraha 9.0