भंडारा,
Paddy weeds जिल्हा विकास आराखडा अंतर्गत दुग्ध उत्पादनात वाढ करणे, चा-याची पौष्टिकता वाढविणे आणि कमी खर्चात चारा उत्पादन करून होणारा अधिकचा खर्च कमी करीत पशूपालकांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालणे व रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नुकतीच पशुसंवर्धन विभागाची बैठक घेतली.
जिल्ह्यात पशुपालकांकडे मुबलक प्रमाणात तणस उपलब्ध राहत असल्याने त्यावर प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपलब्ध चा-यापासून टीएमआर ब्लॉक्स तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले. पशुपालकाना साठवणुकीसाठी व टिकविण्यासाठी तथा वाहतुकीसाठी हे ब्लॉक सहज शक्य होतात. Paddy weeds पशुपालकाला याचे निर्मिती तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास सहज तयार करू शकतील, असा विश्वास वरिष्ठ महाप्रबंधक डॉ.व्ही.श्रीधर यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात मका लागवड वाढ झालेली असून धान्य रूपातील मका काढून घेतल्या नंतर उर्वरित रोपट्यापासून मुरघास तयार करता येऊ शकतो. Paddy weeds भंडारा जिल्ह्यात तणस व रब्बी हंगामातील उत्पादना नंतर उर्वरित वाळलेला चारा यावर कल्चर प्रक्रिया करून निकृष्ट चा-याची पौष्टिकता वाढवता येत असल्याचे व्हीएनआयटी चे प्रा.डॉ.मांडगवने यांनी सांगितले.
या बैठकीला प्रादेशिक Paddy weeds पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.सतीश राजू, व्हीएनआयटीचे डॉ.मांडगवने, वरिष्ठ महाप्रबंधक डॉ.व्ही. श्रीधर, प्रा. माफसू, डॉ.अतुल ढोक, कृषी विज्ञान केंद्र साकोलीच्या डॉ.उषा डोंगरवार, आत्मा प्रकल्प संचालक उर्मिला चिखले, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.एस.वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जगन्नाथ देशट्टीवार, जिल्हा नियोजन अधिकारी श.क.बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.