भंडारा,
Request Bus Stop गावात विनंती बसथांबा असतानाही तेथे एसटी महामंडळाच्या बसगाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालगाव येथे बस थांबविण्याची मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे नरेंद्र पहाडे यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील पालगाव येथे बस थांबा असतांनाही पवनी व भंडारा आगाराच्या साधारण बसेस थांबत नाही. गावातील शाळकरी विद्यार्थी शिक्षणाकरीता तसेच गावातील कामगार वर्ग रोजगाराकरीता आणि ग्रामस्थ कार्यालयीन कामाकरीता शहराकडे ये-जा करत असतात. Request Bus Stop मात्र बस थांबत नसल्याने विद्यार्थी, कामगार व ग्रामस्थांना ये-जा करण्यास शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लक्षात घेता आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भंडारा-पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट— राज्य मार्ग परिवहन महामंडळ भंडारा विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख ललित बोंद्रे, शहरप्रमुख आशीक चुटे, शैलेश खरोले, राकेश आग्रे, बाला वाडीभस्मे, आकाश माळवे, अजय लुटे, नानू मते, जयेश रामटेके, नाना मते, स्वप्निल भुरे इत्यादी उपस्थित होते.