गडचिरोली,
संपूर्ण महाराष्ट्रातीलarvind poreddiwar शैक्षणिक सत्रात नावलौकीक असलेल्या सर्वोदय शिक्षण मंडळ या संस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीकरिता 31 जुलै ला सर्वोदय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष असलेले अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये इतर arvind poreddiwar कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदाकरिता प्रशांत शांताराम पोटदुखे यांना कायम ठेवण्यात आले आहे. कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, उपाध्यक्ष सगुणा तलांडी व सहसचिव म्हणून कीर्तीवर्धन दीक्षित यांना कायम ठेवण्यात आले आहे. सुधा शांताराम पोटदुखे यांच्या निधनानंतर सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. पोरेड्डीवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने संस्थेद्वारे विदर्भात संचालित असलेले सर्वच महाविद्यालय, शाळांमधील कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, सदर अध्यक्षपद मिळण्यात सुरेश पोटदुखे यांचे मोठे योगदान आहे. सर्वोदय शिक्षण मंडळ संस्था मागील 65 वर्षापासून कार्यरत असून सदर संस्थेचे कार्यक्षेत्र विदर्भात विस्तारलेले आहे. अध्यक्षपदाकरिता निवड ही सर्वानुमते करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी संस्थेला यशोशिखरावर नेण्याकरिता सामूहिकरित्या प्रयत्न करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. सर्वोदय शिक्षण मंडळ संस्था 1959 ला स्थापन झाली असून माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री स्व. शांताराम पोटदुखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थेचे कार्यक्षेत्र विदर्भात असून या संस्थेअंतर्गत विविध अभ्यासक्रमांचे शाळा, महाविद्यालय विदर्भात कार्यरत आहेत.