नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी

10 Aug 2024 19:51:26
- देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
 
मुंबई,
वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. नार-पार-गिरणा नदी १०.६४ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. यामुळे तब्बल ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला फायदा होईल. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
devendra
 
देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पालाही राज्यपालांनी मंजुरी दिली. मी राज्यपाल राधाकृष्णन् यांचा मनापासून आभारी आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोर्‍यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून, त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे, असे फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.
 
 
Devendra Fadnavis ; या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे. यामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोर्‍यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. आता या योजनेला मंजुरी मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0