गोंदिया,
Former MLA Jain's : शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजेंद्र जैन यांचा वाढदिवस शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची जनजागृती करुन साजरा करण्यात आला.

शहरातील गौतमनगर शीतला माता मंदिर, श्रीनगर येथील जैतवान बुद्ध विहार, पी. पी. महाविद्यालय व सूर्याटोला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध महामंडळाच्या जनकल्याणकारी योजनांची समाजकल्याण विभागाच्या तज्ञाकडून माहिती देण्यात आली. यात मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, अनू. जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने दिव्यांगांकरिता विविध योजना, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या वतीने मागासवर्गीय करीता विविध योजना, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ च्या वतीने अनू.जाती व नवबौद्ध घटकांकरिता विविध योजना, गटई कामगारांकरिता विविध योजना, अनू. जाती करिता घरकुल संबंधी माहिती, अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना, विद्यार्थ्यांकरिता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योज़ना या योजनेसह लाभार्थ्यांची पात्रता, लागणारी कागदपत्रे, योजनेच्या अटी व शर्तीची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी नानू मुदलियार, नागो बन्सोड, प्रशांत सोनपुरे, सक्षम लांजेवार, राजेश उके, समीर लांजेवार, राकेश नागदेवे, नझार खान, राकेश घोडेश्वर, नीलेश भालेराव, वंश भुतमांगे, नूर जहां, श्रीकांत बडोले, धम्मदीप बोरकर, प्रतीक नागदेवे, योगराज बोरकर, विजया खोब्रागडे, अमन पुंक, अमित चौहान, प्रमिला बोरकर, ओमिका रामटेके, ललिता बागडे, मंजू खोब्रागडे, इशक खान, कमल बोरकर, उषा रजवान, रजनीश बोरकर, उषाकिरण खोब्रागडे, शान्तनु वहंत, ममता रंगारी, अनुराग बोरकर, नरेंद्र मेश्राम, बबलू उके, भजन सुखदेवे, प्रीति बोरकर, राकेश मेश्राम, नितिन खोब्रागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.