- राज ठाकरे यांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना इशारा
छ. संभाजीनगर,
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आडून राजकारण सुरू आहे. माझ्या दौर्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप मनसेचे प्रमुख Raj Thackeray राज ठाकरे यांनी शनिवारी केला. माझ्या नादी लागू नका. अन्यथा तुम्हाला घेता येणार नाहीत. माझे कार्यकर्ते काय करतील, याचा नेम नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना येथे पत्रकारांशी चर्चा करताना दिला.
महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही, या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. माझ्या दौर्याचा मनोज जरांगे यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. मात्र, माझ्याविरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात असा आरोप राज ठाकरेंनी केला. माझा आणि मनोज जरांगेंचा संबंध नाही. पण, उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरांगेंच्या अडून राजकारण करीत आहेत. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असो. माझ्या नादी लागू नका. माझे कार्यकर्ते काय करतील, हे सांगता येत नाही. उद्या हे मोहळ उठले, तर एकही सभा घेता येणार नाही. प्रस्थापित आहेत अन् माझ्याकडे विस्थापित आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही
आरक्षणासंदर्भात माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. आरक्षण द्यायचे असल्यास आर्थिक निकषांवर द्यावे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे, अनेक नोकर्या आहेत. त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्याव्या. आर्थिकदृष्ट्या असलेल्यांना आरक्षण द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे
मनोज जरांगे यांच्या आडून विधानसभेसाठी राजकारण सुरू आहे. शरद पवारांसारखा व्यक्ती महाराष्ट्राचा मणीपूर होईल, असे वक्तव्य करीत आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत ज्येष्ठ आहेत. त्यांनी पुढे येऊन हे सर्व थांबवले पाहिजे. मात्र, तेच महाराष्ट्राचा मणीपूर होईल असे असे Raj Thackeray राज ठाकरे म्हणाले.