प्रतिष्ठा जपावी लागते!

    दिनांक :10-Aug-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
Uddhav Thackeray : भाजपा-शिवसेना युती ही १९८९ मध्ये झाली होती. तेव्हापासून २०१९ पर्यंत भाजपाचे दिग्गज नेते. मग ते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अमित शाह यांसारखे मोठे नेते नेहमी मातोश्रीवर जाऊन जागावाटपाची किंवा युतीसंदर्भातल्या अन्य बाबींची चर्चा करायचे. हा होता मान आणि रुतबा बाळासाहेबांचा आणि त्यांच्या मातोश्रीचा. माणसाचा फार मोठा असतो आणि तो मिळविण्यासाठी अनेक मान्यवर मंडळींनी सारं आयुष्य वेचलेलं असतं. त्यासाठी त्या व्यक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण असते. कोणालाही मानसन्मान, प्रतिष्ठा सहजासहजी मिळत नाही आणि मिळालीच तर, मग ते जपणं मोठं आव्हान असतं. प्रत्येक माणसाला आपली प्रतिष्ठा जपावी लागते. त्यासाठी स्वतःचे वागणे, व्यवहार, सत्यवचन व प्रामाणिक असावा लागतो प्रतिष्ठा केवळ जपलीच जात नाही तर ती आणखी वाढते. बाळासाहेबांच्याहीबाबतीत असंच झालं. त्यांची प्रतिष्ठा दिवसागणीक वाढत गेली. त्यांच्या राहत्या घराचा अर्थात ‘मातोश्री’चा रुतबा वाढला आणि तो त्यांनी तेवढ्याच प्रामाणिकतेने अखेरच्या श्वासापर्यंत जपलादेखील. भाजपाच्या नेतेमंडळींनीदेखील नेहमी त्यांचा आदर राखण्यात, सन्मान करण्यात कुठलीही कसर सोडली नाही. मात्र, त्यांच्या मुलाने हिंदुत्व गहाण आता मातोश्रीची प्रतिष्ठादेखील दिल्लीतील मातोश्रीच्या, नव्हे हायकमांडच्या चरणावर नेऊन ठेवली. कशासाठी तर केवळ सत्तेच्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी. बाळासाहेबांनी सत्ता आणि पदासाठी कधीही लाचारी पत्करली नाही. त्यांनी केवळ आपली प्रतिष्ठा जपली. त्यामुळे मोठमोठ्या पदांवरील लोकांनी त्यांना सलाम ठोकला. मुळात प्रतिष्ठा जपता आली पाहिजे. उद्धव ठाकरेंना ती जपता आली नाही, यापेक्षा बाब म्हणजे, स्वतःहून नीलामी करण्याची त्यांची कृती ही खर्‍या अर्थाने बाळासाहेबांनी कमाविलेल्या प्रतिष्ठेला धुळीस मिळविणारी ठरत आहे.
 
 
Uddhav Thackeray
 
निमित्त झालं ते केवळ महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या निमित्ताने उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौर्‍याचं. आपला घरगडी आणि मुलासह तब्बल तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय मल्लिकार्जुन खडगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या घरी आपल्या चपला झिजवल्या. एवढेच नव्हे तर दिग्विजयसिंह यांच्याही घरी ते जाऊन आले. झोळी पसरवून थोड्याशा अधिक जागा पदरात टाका, मुख्यमंत्री पदासाठी विचार करा, अशी दयायाचना करून, खाली झोळीने उद्धव आणि युवराज माघारी परतले. काँग्रेसने आधीच जाहीर करून आहे की, महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेस लढेल. कारणही ठोस आहे. सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचे ३७ आमदार आहेत. तर, उबाठाचे १६ आणि शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे १३ खासदार असून उबाठाचे ९ आणि शप गटाचे ८ खासदार आहेत. त्यामुळे राज्यातील संख्याबळानुसार जागावाटपाचा फार्म्युला असणे स्वाभाविक आहे. अर्थात जास्त खासदार आमचे असल्याने आम्हाला सर्वाधिक जागा पाहिजे, असा आग्रह करून मविआमध्ये सर्वाधिक २१ जागा लढणार्‍या उद्धव ठाकरेंचाच हा फार्म्युला असल्याने, आता विधानसभेत याच फार्म्युलावर जागावाटप काँग्रेस करेल, यात शंका नाही. यावेळी तुमची सौदेबाजी आणि मुजोरी झेलायला समोर भाजपा नाही. २५ वर्षांच्या युतीला प्रत्येक वेळी सर्वाधिक जागा लढविण्याचा अट्टाहास १७० च्या आसपास जागा पदरात पाडून घेतल्याने शिवसेनेच्या भाजपापेक्षा दोन-चार जागा जास्त विजयी व्हायच्या; मात्र विजयाचा स्ट्राईक रेट भाजपाचा जास्त असायचा. १९९५ च्या निवडणुकीत १६९ जागा लढून ६३ विजयी झाले. दुसरीकडे भाजपाला ११६ लढून ६५ जागांवर विजय मिळाला. २०१४ मध्ये भाजपाने सतत पराभव होत असलेल्या जागांमध्ये अदलाबदल करू म्हटले होणार नाही... अशा कडक शब्दात नकार समोरून मिळाला. जागा थोड्या वाढवून द्या, १३५ पर्यंत तरी द्या, अशी एकप्रकारे दयायाचनाच उद्धव ठाकरेंपुढे भाजपा करत राहिला. यात २१ जागा पुन्हा महायुतीतील सहयोगी पक्षांना भाजपाने आपल्या कोट्यातून द्यायच्या होत्या. असे असताना, तिकडे नव्याने राजकारणात पदार्पण केलेल्या युवराजांनी ‘अब की बार १५० पार’चा दिला होता. तेव्हा तो नारा चालला, ती मुजोरी वगैरे किंवा जनतेला गृहीत धरण्यासारखे काहीही नव्हते. पण ४०० पार म्हणणे म्हणजे मुजोरी, जनतेला गृहीत धरणे वगैरे होते, बरं का...
 
 
Uddhav Thackeray : १५० पारच्या नार्‍यामुळेच किंवा युवराजांच्या बालहट्टामुळे २५ वर्षे जुनी युती अखेर तुटली, असे शिवसेनेचे रक्ताचं पाणी करणारे नेते नंतरच्या काळात सांगू मग काय २०१४ ला २८२ जागा लढवून केवळ ६३ जागा निवडून आल्या आणि २६६ जागा लढवून भाजपाचा १२२ जागांवर विजय झाला. छोटा भाऊ -मोठा भाऊचा शिवसेनेने उपस्थित केलेला विषयच एका झटक्यात संपवून टाकला या निकालाने. राज्यात आम्ही ‘मोठा भाऊ’ हा शिवसेनेचा भ्रम दूर झाला. या निकालाचा अन्वयार्थ हाच होता ५०-६० जागा जास्त लढविल्या तर दोन-चार जागा अधिकच्या येणारच. त्यामुळे शिवसेनेच्या नेहमी भाजपापेक्षा दोन-पाच जागा जास्त राहायच्या. मात्र, विजयाचा स्ट्राईक रेट हा नेहमीच भाजपाचा अधिक होता. पण शिवसेनेने कधीही या वास्तवाला मान्य न करता केवळ मुजोरी आणि शिरजोरीच्या जोरावर जास्तीच्या जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. भाजपाच्या त्या काळातील नेत्यांच्या बाळासाहेबांप्रतीच्या आदरामुळे घेतलेल्या पडत्या किंवा मवाळ भूमिकांमुळे शिवसेनेची मुजोरी वाढत गेली आणि सातत्याने भाजपाची युतीमध्ये पिळवणूक होत गेली. अशाच मुजोरी आणि पिळवणुकीचा भाग म्हणजे १९९५ मधल्या सरकारमध्ये केवळ ८ जागांचा फरक असताना, शिवसेनेने अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री दिला नव्हता आणि २०१९ मध्ये भाजपाचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ अशा असलेल्या तब्बल ४९ जागांचा मोठा फरक असताना, यांना मुख्यमंत्रिपद विभागून पाहिजे होते. २५ वर्षे केलेली मुजोरीची सवय उद्धव ठाकरेंनी कायम ठेवावी. आता कशाला चपला झिजवताय्, विनवण्या करत आहेत काँग्रेसच्या. लोकसभेत १८ पैकी १३ खासदार सोडून गेल्यानंतरही १८ खासदारांच्या आकड्यावर जागावाटप केले होते ना. त्याच धर्तीवर विधानसभेत आमचे ५६ होते; त्यानुसारच वाटप झाले पाहिजे, असा आग्रह धरा, नसेल देत तर चपला झिजवू नका. खरंच मर्द असाल तर, काँग्रेसला थेट शिवसेना स्टाईल इशारा द्या. नाक घासत मातोश्रीवर आले पाहिजे. बाळासाहेबांच्या पुत्राला सत्ता, खुर्चीसाठी असं दारोदारी फिरणं बरं दिसत नाही उद्धव साहेब. हा सह्याद्री दिल्लीसमोर झुकला नाही, झुकणार नाही, मुजरा करणार नाही. आपणच नेहमी सांगता. मग दिल्लीला मुजरा करायला कशाला जायचं साहेब आपण? 
 
- ९२७०३३३८८६