दिशाभूल करणारे वृत्त दिल्यास निर्बंध

11 Aug 2024 21:36:18
- अंतरिम सरकारचा माध्यमांना इशारा
 
ढाका, 
Bangladesh Interim Govt : खोट्या किंवा दिशाभूल करणार्‍या बातम्या द्याल, तर प्रकाशन संस्था बंद केली जाईल, असा सज्जड इशारा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने माध्यमांना रविवारी दिला. चुकीची माहिती पसरवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अंतरिम सरकारने हे पाऊल उचलले आहे. प्रसारमाध्यमे सत्य सांगत नाही, त्यावेळी देश डळमळतो, असे अंतरिम गृह विभागाचे सल्लागार सेवानिवृत्त बि‘गेडियर जनरल एम. शेखावत होसेन यांनी राजबाग मध्य पोलिस रुग्णालयात जखमी पोलिसांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
 
 
Bangladesh Interim Govt
 
Bangladesh Interim Govt : दिशाभूल करणारे वृत्त प्रकाशित केल्यास मीडिया हाऊस बंद केले जाईल, असा इशारा त्यांनी दिल्याचे वृत्त ढाका ट्रिब्यूनने दिले. माध्यमांनी प्रामाणिक वार्तांकन न केल्यास देशाची अवस्था बिकट होते. माध्यमांनी अचूक वार्तांकन असते, तर सध्या पोलिसांना हाताळावी लागणारी परिस्थिती निर्माण झाली नसती, असे त्यांनी माध्यमांवर टीका करताना सांगितले. माध्यमांकडून सत्याकडे दुर्लक्ष केले जाते. वाहिन्यांवरील टॉक शोमध्ये वस्तुनिष्ठता नव्हती आणि माध्यम अचूक माहिती देण्यात अपयशी ठरली. दरम्यान, विद्यार्थी आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा बंद करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे पोस्ट-दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार नाहिद इस्लाम यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0