बांगलादेश पेटला ! संतप्त जमावाने केला लष्करावर हल्ला...अनेक जखमी

11 Aug 2024 11:02:56
नवी दिल्ली,
बांगलादेशात Bangladesh violenceअजूनही हिंसाचार सुरूच आहे. गोपालगंज भागात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार आणि निदर्शने होत असताना जमावाने सैन्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले.बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंसाचार आणि निदर्शने सुरूच आहेत. अंतरिम सरकारचे नेते मोहम्मद युनूस यांनी हिंदू आणि अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. असे असतानाही देशात हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, गोपालगंज भागात आंदोलकांनी लष्करावर हल्ला केला ज्यात लष्कराचे पाचहून अधिक जवान जखमी झाले. शनिवारी लष्कराचे जवान आणि अवामी लीग समर्थकांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीनंतर जमावाने लष्कराचे वाहन जाळले. या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह सुमारे 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना गोळ्या लागल्या आहेत. सदर उपजिल्हातील गोपीनाथपूर बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हेही वाचा : ...अदानीनंतर आता सेबी आहे रडारवर !

dfdf 
शेख हसीना यांना देशात परतण्याची मागणी
माजी पंतप्रधानBangladesh violence शेख हसीना यांच्या देशात परतण्याच्या मागणीसाठी हजारो अवामी लीग नेते, कार्यकर्ते आणि स्थानिकांनी महामार्ग रोखून निषेध नोंदवला होता. लष्कराच्या जवानांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना रस्ता रिकामा करण्याचे निर्देश दिले मात्र जमावाने त्यांच्यावर विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड करून ती पेटवून दिली. हेही वाचा : बांग्लादेश पेटले ! संतप्त जमावाने केला लष्करावर हल्ला...अनेक जखमी
लेफ्टनंट कर्नल यांनी माहिती दिली
गोपालगंज कॅम्पचे Bangladesh violenceलेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की सुमारे 3,000 ते 4,000 लोक जमले आणि त्यांनी रस्ता अडवला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत. गोपीनाथपूर युनियनचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या सदस्यांनी गोळीबार केला. यानंतर “मुलासह दोन जणांना गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरातील परिस्थिती शांत झाली.
Powered By Sangraha 9.0