घुसखोरी करताना ११ बांगालदेशींना अटक

11 Aug 2024 21:42:23
-बंगाल, मेघालयात बीएसएफची कारवाई
 
नवी दिल्ली, 
Bangladeshi infiltrators arrested : पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मेघालयातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न करताना ११ बांगलादेशींना अटक करण्यात आली, अशी माहिती सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने रविवारी दिली. सध्या त्यांची चौकशी सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना राज्य पोलिसांकडे सोपवले जाईल, असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. भारतीय तसेच बांगलादेशातील अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी बीएसएफ बांगलादेशच्या बीजीबीसोबत नियमित संपर्कात आहे, असे प्रवक्ता म्हणाला.
 
 
BSF in Bengal
 
Bangladeshi infiltrators arrested : बांगलादेशातील सध्याची स्फोटक स्थिती आणि स्वातंत्र्यदिनाच्या पृष्ठभूमीवर बांगलादेशासोबत असलेल्या ४,०९६ किमी लांबीच्या सीमेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ईस्टर्न कमांडचे अतिरिक्त महासंचालक रवी गांधी यांनी शनिवारी एक परिषद घेतली, अशी माहिती साऊथ बंगाल फ्रंटियरच्या कोलकातातील मुख्यालयाने दिली. भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ११ बांगलादेशींना अटक करण्यात आली. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरातून प्रत्येकी दोन, मेघालयातील सीमेवरून सात जणांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली जात आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी लवकरच त्यांना पोलिसांकडे सोपवले जाईल, असे बीएसएफने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0