कापूस-सोयाबीनसाठी हेक्टरी ५ हजारांचे अनुदान

11 Aug 2024 16:57:29
मुंबई, 
Capus-soybeans : २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकर्‍यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा, यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. २०२३ च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.
 
 
cotton-soybeans
 
Capus-soybeans : सदर रक्कम सोयाबीन-कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेर्‍यांची नोंदणी केलेली आहे, अशा सर्व शेतकर्‍यांना दिली जाणार आहे. शेतकर्‍यांचे आधार व बँक खाते संलग्न माहिती कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकर्‍यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या खात्यावर निधी वितरीत करता येईल, असेही मुंडे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0