ओबीसींवर चालून येतील, त्यांना सोडू नका

11 Aug 2024 21:18:04
- छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका
 
सांगली, 
मनोज जरांगे यांनी सगेसोयर्‍यांची मागणी मान्य होणे शक्य नाही, सर्वांनाच कुणबी व्हायचे आहे; मग राज्यात मराठा शिल्लक राहतील का, असा सवाल मंत्री Chhagan Bhujbal छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना विचारला. सर्वच मराठे वाईट नाहीत, पण ओबीसींच्या अंगावर चालून येणार्‍यांना नका, असे आवाहन भुजबळांनी केले.
 
 

Chhagan Bhujbal
 
सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भुजबळांनी मनोज जरांगेंना पुन्हा आव्हान दिले. राज्यात विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवू, असे ते म्हणतात. ८८ जागा लढवून दाखवा आणि त्यातले ८ निवडून आणून दाखवा, असे आव्हान भुजबळांनी दिले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही, देखील आरक्षण देता येणार नाही, हे जरांगेंनी समजून घ्यावे, असे Chhagan Bhujbal भुजबळ म्हणाले.
 
 
सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्याचे वारसदार कुठे, असे म्हणत भुजबळांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे म्हणजे नवीन नेता, असा उल्लेखही केला. आरक्षण आर्थिक स्थितीवर नसून, सामाजिक मागासलेपणावर आहे, हे त्यांना कसे समजणार, अशी Chhagan Bhujbal  भुजबळांनी जरांगे यांच्यावर केली. सगळे
मराठा शिल्लक राहील का?
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करता. आज गावागावात ओबीसींवर हल्ले होत आहेत. आरक्षण कायद्यानुसार दिले जावे, ही आमची भूमिका आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्वांनाच कुणबी व्हायचे आहे, मग मराठा शिल्लक का, असा सवाल त्यांनी केला. राज्यात ५४ टक्के ओबीसी आहेत, हे जरांगे विसरतात, असेही ते म्हणाले.
शरद पवारांना विचारा
मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, आमची काही हरकत नाही, पण ओबीसीमधूनच आरक्षण हवे, यावर जरांगे अडून बसले. मराठ्यांना आरक्षण द्यायचे की नाही, ते शरद पवारांना विचारा, असे ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0