-बूच, अदानी समूहाने आरोप फेटाळले
नवी दिल्ली,
Reports of Hindenburg Research हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात भारतीय शेअर बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले या नव्या गौप्यस्फोटामुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे, असे हिंडेनबर्गने एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी रात्री उशिरा नवीन अहवाल प्रसिद्ध केला.
यात म्हटले आहे की, बूच दाम्पत्याने कथित अदानी गैरव्यवहार घोटाळ्यात वापरल्या जाणार्या अस्पष्ट ऑफशोअर फंडात भाग घेतला होता. मात्र, या जोडप्याने यापूर्वीच हे निराधार असल्याचे म्हटले आहे. आता अदानी समूहानेही एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, हिंडेनबर्गने केलेले नवीन आरोप दुर्भावनापूर्ण, खोडकर आणि दिशाभूल करण्याच्या हेतूने असल्याचे अदानी समूहाने निवेदनात म्हटले आहे. अदानी समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंडेनबर्गने केलेले नवीन आरोप दुर्भावनापूर्ण आहेत. यासाठी हिंडेनबर्ग फर्मने हेतूने, सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीमधून दिशाभूल करणार्या पद्धतीने निवड केली आहे.
बूच दाम्पत्यांकडून आरोपांचे खंडन
माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल यांनी हिंडेनबर्ग अहवालावर प्रतिकि‘या दिली. ते म्हणाले की, हिंडनबर्ग अहवालात आमच्यावर अनेक आरोप करण्यात आले. या आरोपांच्या संदर्भात आम्ही हे सांगू इच्छितो की, आम्ही या निराधार आरोपांचे जोरदार करीत आहोत. यातील कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही.
हिंडेनबर्गच्या अहवालात नेमके काय?
Reports of Hindenburg Research हिंडेनबर्गने नव्या अहवालात म्हटले की, अदानी समूहासंदर्भातील आमच्या मूळ अहवालाला जवळपास १८ महिने उलटून गेले आहेत. अदानी समूह कॉर्पोरेट इतिहासातील सर्वांत मोठ्या घोटाळ्यात सामील असल्याचे भरपूर पुरावे सादर केले. तथापि, ठोस पुरावे आणि ४० हून अधिक स्वतंत्र मीडिया असूनही सेबीने अदानी समूहाविरुद्ध कारवाई केली नाही. उलट, सेबीने आम्हाला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली.