मुंबई,
लोकसभेची निवडणूकfake narrative महाविकास आघाडी पक्षासोबत नाही लढले तर आपण थेट नेरेटव्ह सोबत आपण लढलो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खोटं बोलायचं तथाकथित पत्रकार आणि काही सोशल मीडियाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचा खोटा प्रचार केला संविधान बदलणार, आपलं आरक्षण जाणार, आरक्षण समाप्त करणार अशा प्रकारचा नेरेटव्ह पसरवण्यात आला. त्यामुळे आपल्या लोकसभेच्या जागा कमी आल्या, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकिसाठी आज अकोल्यात आले होते.
आरक्षण वाढविण्याचे fake narrativeकाम स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने केले आहे. भाजपाचं सरकार आलं तर आरक्षण काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा नेरेटीव्ह खाली पसरवण्यात आला. याचा परिणाम म्हणून आपल्या लोकसभेच्या जागा कमी झाल्या आणि आपण बहुमतात येऊ शकलो नाही हे खर आहे की आपल्या जागा कमी आल्या पण आपला जनाधार कमी झालेला नाही असही ते म्हणाले. अतिशय नॅरो मार्जिनने काही ठिकाणी आपण निवडणूक हरलो जे खोटं असतं त्यांचं वय छोटं असतं दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये नेरेटीव्ह पसरवण्यात आलं आणि गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्राचा वातावरण आपण बदललेलं आहे. लाडक्या बहिणीचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही महाविकास आघाडीवर फडणवीस यांनी केला. लाडकी बहिणी या योजनेत दीड कोटीपेक्षा जास्त नोंदणी झाली असून येत्या 17 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात आपण रक्कम टाकणार आहोत, कुठल्याच बहिणीला या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला. कार्यकर्त्यांनी लाडक्या बहिणीच्या संपर्कात राहिले पाहिजे आणि आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ कोण आहेत हे दाखवून द्यायला पाहिजे असही ते म्हणाले.
शेतकऱ्यांना यापुढे विजेचेfake narrative बिल द्यावा लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आहे. 16 हजार मेघावैट वीज आपला शेतकरी वापरतो आणि आपण 12000 मेगा मेघावैट वीज सोलर पासून निर्मिती करत असल्याची तयारी आपल्या सरकारने केले आहे. पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचा बील येणार नाही असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमानाचे पैसे देण्याची सुरुवात आपण केली आहे शेतकऱ्यांचा विचार करणारं हे सरकार आहे.
विदर्भाचा कायम दुष्काळfake narrative संपवणारा पेनगंगा प्रकल्प याला पण मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून विदर्भाचा दुष्काळ संपणार आहे. या प्रकल्पामुळे अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील पुढच्या पिढीला कोरडवाहू शेती काय असते हे माहित पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था युती सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.