चार बांगलादेशी घुसखोरांना रोखले

    दिनांक :12-Aug-2024
Total Views |
गुवाहाटी, 
Bangladeshi infiltration : आसाम पोलिसांनी बेकायदेशीररीत्या भारतात घुसण्यापासून बांगलादेशींना करिमगंज जिल्ह्यातील सीमेवर रोखले, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी सोमवारी दिली. करिमगंज जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवर पहाटे दीड वाजताच्या सुमारास चार जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
 
 
Bangladeshi infiltration
 
Bangladeshi infiltration : मोइतूर शेख, मुशियर मुल्ला, तानिया मुल्ला आणि रिटा मुल्ला अशी या घुसखोरांची नावे आहेत. पोलिसांनी झीरो पॉईंटवर प्रभावीपणे हस्तक्षेप करीत त्यांना घुसताना रोखले, असे सरमा यांनी सांगितले. बांगलादेशातील परिस्थिती ही ईशान्येसाठी चिंतेची बाब आहे. लोक सीमेवरून घुसण्याची शक्यता आहे आणि शेजारी देश देखील पुन्हा या भागातील बंडखोरीचे केंद्र बनू शकतो, असे सरमा यांनी यापूर्वी म्हटले होते. राज्य सरकारची कडक नजर असल्याने येथील सीमा सुरक्षित आहेत. वैध दस्तावेज असलेल्यांशिवाय इतर कुणालाही घुसू देणार नाही, असे सरमा यांनी सांगितले.